कोकणातील चाकरमानी मुंबईत येण्यास उत्सुक  

           विरार/लोकनिर्माण (दीपक महाडिक)


     कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून लोकडाऊन झाल्याने मुंबईतील उदयोग धंदे बंद असल्याने कोकणातुन मुंबईत आलेल्या चाकरमान्यांची आर्थिक पररिस्थिती  खूपच बिकट झाल्याने  चाकरमानी आपल्या  कुटुंबासह खासगी वाहनाने  प्रत्येक व्यक्तीमागे  दोन-अडीच हजार रुपये खर्च करून  आपल्या गावी गेला.  कारण कोकणातून मुंबईत आलेला बहुतेक चाकरमानी  खासगी कारखान्यात तर कोणी कापड बाजारात, तर कोणी स्टील बाजार, शेअर बाजार, दवा बाजार तर कोणी हॉटेल व इतर कम्पनी मधून नोकरी करत असून बहुतेक चाकरमानी आपल्या परिवारासह विरार, नालासोपारा, कल्याण, ठाणे, बदलापूर येथे  राहत असून मुबंईत नोकरीला येत असतो. तर काही चाकरमानी मुबंईत आपल्या ग्रामस्थांच्या बैठकीच्या खोलीत तर काही चाकरमानी  उपनगरात भाड्याने राहत आहेत. परंतु लाॅकडाऊनमुळे घरी बसून घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आपल्या कुटुंबाचे पोट भरणे अवघड  झाल्याने व मुंबईत दिवसें दिवस खर्च वाढत असल्याने त्यातच लाॅकडाऊनमुळे प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडल्याने व घर भाडे, वीज बिल भरणे अवघड जात होते.


     नोकरी धंदा नसल्याने  चाकरमान्याची अवस्था दयनीय झाल्याने व दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने चाकरमान्याला आपल्या गावी जाण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.  निदान सरकार तरी चाकरमानीसाठी एस टी गाड्या सोडतील अशी अपेक्षा होती.   परंतु सरकारने कोकणात  जाण्यासाठी एसटी गाडीची सोय केल्या नसल्याने  मुंबईत तसेच  व उपनगरातून दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या भीतीने   दिवस भर घरी राहण्याऐवजी व मुलांचे शाळा कॉलेज बंद असल्याने चाकरमान्यानी आपल्या गावी जाण्याचे अधिक पसंत केले. कारण एक तर मुबंईतील उद्योग धंदे कधी चालू होतील याची खात्री  नाही हे सर्वांना ठाऊकच होते.  परप्रांतीय आपल्या गावी जाऊ लागले  होते, मग आपण ही आपल्या गावी का जाऊ नये असे प्रत्येक चाकर मान्याला वाटत होते.  सरकारनेही कोकणात जाण्यासाठी ई पास  असणे बंधनकारक आहे असे जाहीर केले होते.  चाकरमानी  ई पास काढून खासगी वाहनाने  भरमसाठ तिकिटाचे भाडे देऊन आपल्या गावी  गेले. गावी जाऊन ज्याची शेती होती ते चाकरमानी शेती करू लागले.  पण काही चाकरमान्यांची शेती नसल्यामुळे  गावातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करू लागला.  गावी राहून निदान आपण सुखी राहू असे प्रत्येकाला वाटले होते, परंतु आता चार महिन्यानंतर गावी राहून तेथे काम धंदा नसल्या कारणाने तेथे ही आर्थीक परिस्थिती बिकटच झाली असून पैशाचीही चणचण भासू लागल्याने व आपल्या कुटुंबाचे गावी राहून पोट कसे भरावे हा प्रश्न सतावत आहे. कारण येताना ज्यांनी  गावी जाताना  घर खर्चासाठी जे काय  पैसे नेले होते  ते तीन चार महिण्यात खर्च ही झाले. एक तर गावी राहून रोजगार नसल्याने त्यातच आता सणा सुदीचे दिवस आल्या कारणांमुळे चाकरमानी खूपच चिंतेत  आहे  दोन तीन महिन्यात कोरोनाचे संकट दूर होईल व मुंबईत उद्योग धंदे सुरळीत चालू झाल्यावर आपण मुबंईत येऊ  असे प्रत्येकाला वाटत होते. एकीकडे  मुंबईत काही मोजकेच उद्योग धंदे चालू झालेत.  परंतु चाकरमानी वर्ग  उपनगरात राहत असल्याने रेल्वेमध्ये  अत्यावश्यक सेवा असणाऱ्या कर्मचारी वर्ग या प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी असून  खासगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या  कामगारांना  रेल्वेत  प्रवास करणे मनाई असल्याने आपण मुबंईत येऊन नोकरीवर कसे जाणार हा ही पश्न पडला असून कोरोनाचे संकट कधी दूर होईल  व पुन्हा कधी आपण नोकरीवर जाऊ याचा प्रत्येक जण विचार करत आहे.   कारण  बहुतेक परप्रांतीय आपल्या गावी जाऊन पुन्हा मुंबईत  येऊन काम धंदा करू लागले. परंतु सरकार अद्याप कोकणातून मुंबईत येण्यासाठी एसटी गाड्या सोडत नाही त्या मुळे चाकरमानी नाराज आहे.  कारण खासगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी महागडे तिकीट भाडे परवडेनासे झाले आहे. जर शासनाने एसटी गाड्याची सोय केली तर काही चाकरमानी मुंबईत  येण्यासाठी उत्सुक असल्याचे  कळते.