पुरग्रस्तांना त्रास होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी , आढावा बैठकीत आ योगेशदादा कदम आक्रमक

 

खेड/ लोकनिर्माण - किशोर साळवी



 पुरपरिस्थीतीनंतर जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक बोलवावी. अशी मी मागणी केली होती. त्याप्रमाणे  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार महोदय आक्रमक होत.  काही गोष्टी  जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या.  प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करून. त्यांनी ज्या पुरग्रस्तांचे नुकसान झाले आहे. मग ते शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातील अशा पुरग्रस्तांना त्रास होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. जेणेकरून पुरग्रस्तांना हेलपाटे लागणार नाही. याकडे लक्ष द्यावे.  बाधीत पुरग्रस्त  मदतीविना वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी. मी देखील शासकीय मदत सर्वच बाधीत पुरग्रस्तांपरयंत  कशी पोचेल.  याकडे लक्ष देणार आहे.  त्यांचे बँकेचे खाते नंबर घेण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यापर्यंत पोचावे.  कि ज्या सुचना पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या. त्याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले. तसेच अन्य काही सुचना मांडल्या त्या जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्याचे सांगून आमदार महोदय यांनी केलेल्या सुचनांचे पालन केले जाईल. अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली. अशी माहीती आ योगेशदादा कदम यांनी दिली.