रत्नागिरी/ लोकनिर्माण ( मानसी सावंत)
रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे आहे.या जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू, वृक्ष लागवडीवर भर देऊन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.