प्रतिज्ञा (कोरोनावर) - लेखक, विलास देवळेकर


                                 
        भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव व भगिनींना सावध राहावे, हि काळाची गरज आहे.
        चीनचा कोरोना व्हायरस हा, महामारीचा महा विषाणू ३ऱ्या  महायुद्धाचा व्हायरस आहे.
           आपल्या काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी, आपल्या भारतीय डाॅक्टरांच्या, विज्ञानवादी विचारांवर माझा आत्मविश्वास आहे. माझ्या देशाच्या सरकारचा, आणि राज्य सरकारचा मला अभिमान आहे. आपल्या प्रशासकीय विचार धारना, प्रत्येक नागरिकाने पाळावी. आणि संपूर्ण भारत देश कोरोना व्हायरस मुक्त करण्यासाठी, मी सदैव घरात राहूनच लढाई करीन.
         मी माझ्या शेजारी- नातेवाईक आणि मित्र मंडळी पासून, स्वत:च्या घरात बंदिस्त राहिन. पण प्रत्येकाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार, आणि व्यायाम करण्यासाठी, तसेच घरातून बाहेर न जाण्यासाठी, मी स्वत: मोबाईल द्वारे सांगेन. आणि डॉ. पोलिस आणि सफाई कामगारांशी  सौजन्याने वागेन.
        मी लाॅकडाऊन मध्ये समोरच्याशी आणि बाजारात दोन हात अंतराने सहयोग करण्याची, तसेच सतत एक तासाने हात धुवण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.  मी अफवावर विश्वास ठेवणार नाही. आणि कोणाला ठेवू देणार नाही. सर्व भारतीयांचे मनोबल- सुदृढ आरोग्य लाभो, नी भारत देश कोरोना व्हायरस मुक्त होवो. यातच माझे सौख्य सामावले आहे.


             ~@मी विज्ञानवादी भारतीय नागरिक
 लेखक :- विलास ह.ल. देवळेकर - मुंबई