मोठ्या मनाचा संपादक !! कवी - विलास देवळेकर


                                ११ मे २०२०


 



लोक निर्माण मराठी साप्ताहिक वृत्तपत्रकाचे
 मुख्य संपादक श्री बाळकृष्ण कासार सर


आपल्या लग्नाला झाली ३३ वर्षे
आपल्या लोकनिर्माण साप्ताहिकाला झाली ११ वर्षे
आपण दोन्ही ठिकाणी फुलवले नंदनवन
 कासार सर, आपले अभिनंदन !!१ !!


संसाराचा गाडा
पत्रकारितेचा नाडा 
आपण केले आयुष्याचे चंदन 
कासार सर, आपले अभिनंदन !! २ !!


आपल्या पत्नीची साथ
धडपडणाऱ्या पत्रकारावर मात 
आपल्या संपादकास करीतो वंदन
कासार सर, आपले अभिनंदन !! ३ !! 



 असे तान मुलांच्या शिक्षणाचा
११ जिल्ह्यात एकाच वेळी वृत्तपत्र प्रकाशनाचा
नसे आपल्यावर कोणाचे बंधन
कासार सर, आपले अभिनंदन !! ४ !!


आपण सामाजिक- राजकारणात फिरता
आणि वेगवेगळ्या विशेषांक सादर करता
तरीही आपण धावपळीत दिसता आनंदन
कासार सर, आपले अभिनंदन !! ५ !!


आपणांस मिळे अनेक नामांकित पुरस्कार
 आपल्या सामान्य लोकांना मदतीने, कोणी ना करे तिरस्कार
म्हणून आपणांस करीतो ११वेळा  वंदन
कासार सर, आपले अभिनंदन !! ६ !! 


आपल्या *लग्नाच्या वाढदिवसानिमित्त* आजचा क्षण,
शतक महोत्सवी वर्षात साजरा होवो, हि शुभेच्छा !  🌹


आणि आपल्या *लोकनिर्माण साप्ताहिक वृत्तपत्रकाचे वर्धापनदिन* 
आजचा क्षण, शतक महोत्सवी वर्षात साजरा होवो, हि सदिच्छा !! 🙏
   
                    आपल्या अंकाचा दास
                           विलुदास
                   विलास ह.ल. देवळेकर
                          मुंबई, आयकर भवन