लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून पत्रकारदिन साजरा


चिपळूण/लाेकनिर्माण (जमालुद्दीन बंदरकर)

चिपळूण- मराठी वृत्तपत्र लाेकनिर्माणच्या पत्रकार टीमच्या वतीने लाेकनिर्माणच्या चिपळूण येथील मुख्य कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती काल  शनिवारी साजरी करण्यात आली. या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला लाेकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करून पत्रकारदिन साजरा करण्यात आला. 



 या वेळी दसपटी विभाग प्रतिनिधी संताेष शिंदे,शहर प्रतिनिधी साै.स्वाती हडकर,तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर यांनी आपल्या मनोगतातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी तत्कालीन पत्रकारीता आणि आजची पत्रकारीता याबद्दल भाष्य केले. व सांघीक वृत्तीने एखादी समस्या हाताळल्यास ती समस्या मार्गी लागण्यास मदत होऊ शकते. यासाठी पत्रकारांची एकजुट महत्वाची असल्याचे सांगितले. संपादक बाळकृष्ण कासार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारांनी एकजुट कायम ठेवण्याचा मौलीक सल्ला दिला. तसेच पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. 



 या वेळी सहसंपादक साै.सुविधा कासार, संगमेश्वर शहर प्रतिनिधी धनाजी भांगे आदी पत्रकार उपस्थित हाेते.

Popular posts
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image