आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत

 

ऱाजापूर / लोकनिर्माण टीम 




यापुर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या त्यांच्यावर चावडीवर सभा घेण्याची वेळ आली असा समाचार राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यान्नी उबाठा सेनेला लगावताना आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल असा विश्वास व्यक्त केला.

राजापूरातील राजीव गांधी मैदानावर शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत सभेला ते संबोधीत करताना जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यान्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शासनाने केलेल्या कामांचा जोरदार गौरव केला.

यापुर्वी १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजापूरला विशाल जाहीर सभा झाली होती त्यानंतर कोकणातील राजकीय चित्र बदलले आणि शिवसेनेचे सर्वच आमदार विजयी झाले होते.  शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ राजापूरातुन रोवली गेली होती . याची त्यान्नी आठवण करुन दिली.

मागील १५ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने अनेक निर्णय घेतले कोकणला खऱ्या अर्थाने न्याय देवुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार केले . रत्नागिरीत सुमारे ५२२ कोटी रुपयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गती मिळाली व ते सुरु देखील झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच खासदार निवडुन येईल आणि समोरच्यांचे डिपॉझीट घालविले जाईल असा जोरदार विश्वास त्यान्नी व्यक्त केला. नारायण राणे यांच्याशी भांडण्यासाठीच आपल्याला महाविकास आघाडी शासन काळात सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दिले गेले असा त्यान्नी अप्रत्यक्ष टोला  कुणाचे नाव न घेता हाणला.

काही जण आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहोत. निवडणुकीपुर्वी पक्षप्रवेश करु असे इकडे तिकडे सांगतात अशान्ना डेडलाईन द्यावी असे त्यान्नी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांचा तो अंगुलीनिर्देश कुणाकडे होता त्याबाबत नंतर चर्चा सुरु होती. काहींच्या संशयाच्या सुया राजापूरातच फिरु लागल्या. जिल्हा पालकमंत्र्यान्नी झालेल्या विकास कामांवर प्रकाश टाकला.