आईच्या गर्भात--
ओझं पेलण्याची शक्ती
प्रेमाची भक्ती
जगवण्याची सक्ती
म्हणजे आई ||१||
आईची नजर--
सांभाळे घरदार
आनंदाचा वार
शत्रूवर भार
म्हणजे आई ||२||
आईचा पदर--
मायेची चादर
समोरच्यास आदर
खाण्याला ना दर
म्हणजे आई ||३||
आईचा हात--
कामाला चटके
वाईटला फटके
वाढदिवसाला हटके
म्हणजे आई ||४||
आईचा पाय--
फिरे वणवण
देई कणकण
हसे मनमन
म्हणजे आई ||५||
आईचा फोन--
बोल तळमळ
मन हळहळ
रागात सळसळ
म्हणजे आई ||६||
आईचा दिवस--
रोज करी सर्व
असे घराला गर्व
हे अखंड पर्व
म्हणजे आई ||७||
प्रत्येक नागरिकाला जागतिक १०६ व्या
*मातृदिनाच्या* मनःपूर्वक शुभेच्छा !! 🙏🌹
मातेचा दास
विलुदास
विलास ह.ल. देवळेकर
मुंबईकर