मासिक पाळी आणि महिला सबलीकरण क्षेत्रात मेडलाईफ फाउंडेशन करतेय देशभरात जनजागृती अभियान ! मेडलाईफ फाउंडेशनचे भुषण शिरूडे यांची कपमॅन म्हणून होतेय ओळख 

 


मुंबई, पुणे, नासिकसह राज्यात ठिकठिकाणी राबवताय मासिक पाळी जनजागृती अभियान 


मुंबई /लोकनिर्माण (प्रतिनिधी)



      मासिक पाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदानचं ज्यामुळे स्त्री जातीला नवनिर्मितीचा आनंद उपभोगता येऊ शकतो. मात्र या वरदानाकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही काही उपेक्षेचाच आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीतून आलेल्या प्रगल्भतेने यात दिवसागणिक बदल होत असला तरी तो बदल सध्यस्थितीत पुरेसा नाही. महिन्यातून एकदा येणारी मासिक पाळी आणि तिचे ते चार दिवस महिलेच्या शारीरिक पातळीवर खूप त्रासदायक असतात. आणि जर या दिवसात उपेक्षेची वागणूक मिळाली तर तिला ते चार दिवस देखील बोचरे ठरतात. त्यामुळे हा काळ तिच्या साठी असाह्य वेदनादायी ठरू शकतो. त्यामळे त्या दिवसात तिची मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्य आहे. म्हणून (मेडलाईफ फाउंडेशन) मेडफेम चे संस्थापक भुषण शिरुडे, सह संस्थापक अश्विनी चौमाल, मयुरी शिरुडे व निवेदिता पगार आणि मेडलाईफ फाउंडेशनची सर्व टीम गेल्या अनेक वर्षांपासून मासिक पाळी व तिचे व्यवस्थापन या विषयांवर जनजागृतीपर अभियान राबवत आहेत. 


    आजही महिलांच्या मासिक पाळीवर उघडपणे बोलले जात नाही. आजच्या आधुनिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपण झपाट्याने प्रगती करतोय तरी देखील समाजात मासिक पाळी विषयी अनेक फालतू गैरसमज लोकांच्या मनात अजूनही आहेत. या बाबतीत समाजात जनजागृती करणे, प्रबोधनपर कार्यक्रम करणे, योग्य वक्ता व डॉक्टर यांनी मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. विज्ञान आणि प्रगतीच्या युगात देखील भारतात मासिक पाळी आणि स्वच्छता याबाबतीत असलेली महिलांची उदासिनता धोक्याचे चित्र निर्माण करणारी आहे.  
    भुषण शिरुडे हे महिलांच्या मासिक पाळी कप (मेन्स्ट्रुअल कप) विषयी विशेष जनजागृती करीत असल्याने त्यांची कपमॅन म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर United Nations ने देखील त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील बहाळ या छोट्याश्या खेड्यातून सुरू झालेल्या भुषण शिरूडे या तरुणाचा मासिक पाळी आणि तिचे व्यवस्थापन या विषयावरील जनजागृतीचा, सामाजिक चळवळीचा, प्रबोधनाचा प्रवाह आज राज्यभर पसरलेला आहे. कपमॅन भुषण शिरूडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मासिक पाळी व तिचे व्यवस्थापन या विषयाशी संबधित अनेक बाबींवर प्रकाश टाकला.


मा(न)सिक  पाळी: 
    मासिक पाळी बद्दल आजकाल शहरातील महिला, मुली बोलायला लागल्या असल्या तरी अजूनही गावांमध्ये महिला याबाबत स्पष्टपणे बोलतांना दिसत नाहीत. मासिक पाळीच्या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलामुळे महिलांमधील चीड-चीडपणा वाढतो. तर अनेकांना पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा असे अनेक त्रास होत असतात. 
     अशा शारीरिक आणि मानसिक तणावातून जात असतांना ‘त्या’ दिवसांमध्ये महिलांनी आपल्या स्वच्छतेची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. जर आपण शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर अनेक प्रकारच्या इंफेक्शनचा त्रास महिलांना होऊ शकतो. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न राखल्यास योनीमार्गातील इंफेक्शन सोबतच इनफर्टिलिटी सारखी समस्याही निर्माण होऊ शकते.
      आंघोळ केल्यानं, केस धुतल्यानं मासिक पाळीत रक्तस्त्राव कमजोर होतो, असा एक गैरसमज आहे. मात्र हे चुकीचं आहे. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण आंघोळ करू शकता. अनेक लोकांना वाटतं की, कुमारीकांनी कॉटनचा वापर करू नये. त्यांनी कॉटनचा वापर केला तर त्यांचं कौमार्य नष्ट होतं. पण याचा काहीही संबंध नाही.
सॅनिटरी पॅड व आरोग्य
माणूस हा दिवसेंदिवस आळशी होत चालला आहे. वापरा आणि फेका अशी प्रवूती माणसामध्ये आल्याने निसर्गाची हानी होत चालली आहे. आजकाल महिला मासिक पाळी मध्ये सॅनिटरी पॅड वापरतात. मुळात सॅनिटरी पॅड हे प्लास्टिक व हानिकारक रसायनापासून बनलेले असते याची कल्पना देखील महिलांना नसते काही महिलांना माहित असते कि आपण जे सॅनिटरी पॅड मासिक पाळीच्या दरम्यान वापरतो त्यामुळे खाज येणे, घाम येणे, जंतुसंसर्ग होणे अशा अनेक तक्रारी 10 पैकी 9 महिला आपल्या वैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञांकडे वारंवार करतात. सॅनिटरी पॅडमध्ये केमिकल चा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कॅन्सर होण्यची दाट शक्यता असते. एवढेच नव्हे तर वापरलेले सॅनिटरी पॅड आपण फेकून दिल्यावर कचरा विभाजन करणारे कामगारांचे देखील आरोग्य धोक्यात असते.
सॅनिटरी नॅपकीनचा उभा राहिल पर्वत:


      भारतात दर महिन्याला ३० कोटींपेक्षा जास्त महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. सरासरी प्रत्येक महिला दर महिन्याला 10 सॅनिटरी पॅड वापरते म्हणजे 10*30 कोटी = 300 कोटी सॅनिटरी पॅडचा कचरा गोळा होतो. सॅनिटरी पॅडमुळे होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी अजून तरी कोणतीही यंत्रणा विकसित झाली नाही आहे कारण ते बायोडीग्रीडेबल नसतात.  शिवाय त्याला जाळले तर त्यातून विषारी वायू (डायऑझ्हीन व फुरान) बाहेर येतो त्यामुळे त्या वायूचे प्रदूषण होते. लोक दगावण्याची शक्यता असते. महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या वजनाचा हिशोब केला तर 30 कोटी महिलांचे सॅनिटरी नपकिन्सचा कचरा 900 मेगा टन एवढा कचरा म्हणजे 32 फुटबाल चे स्टेडीयम भरतील एवढा होईल. जर जगभरात ह्याच प्रमाणावर डिस्पोसेबल सॅनिटरी पॅड वापरले तर लवकरच माऊंट एव्हरेस्टपेक्षा मोठा डोंगर फक्त सॅनिटरी पॅडचाच बघायला मिळेल व फार वाईट अवस्था आपल्या देशाची होईल. पर्यावरणाशी समतोल नाही राखला तर निसर्ग काय हानी करू शकतो याचे भरपूर उदाहरण आपल्याकडे आहेत आणि आपण ते चांगलेच अनुभवतोय.


  पर्यावरणही धोक्यात:


    मासिक पाळी मध्ये वापरण्यात येणाऱ्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड डीग्रेड होत नसल्यामुळे पर्यावरणात 400-500 वर्ष असेच राहतात आणि त्यामुळे प्रदूषण निर्माण होण्यास हे कारण बनतात. हे जमिनीवर असेच राहिल्यामुळे पावसाचे पाणी यातून जिरेल व जमिनीत जाईल म्हणजेच पिण्याच्या पाण्याच्या प्रदुषणासाठी ती देखील एक मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आपण आपल्या घराप्रमाणे पर्यावरणाची देखील काळजी घेतली पाहिजे. सर्वच बायोडीग्रेडेबल करायचे म्हणून सॅनिटरी पॅड पण बायोडीग्रेडेबल म्हणून विकायचे हि एक फॅशन  झाली आहे. सॅनिटरी पॅड बायोडीग्रेडेबल आहेत असा दावा करणार्‍या खाजगी कंपनीकडे असे कोणतेही सायंटिफिक पुरावे व लीगल वैज्ञानिक पुरावा नाही किंवा कोणतीही प्रमाणपत्रे देखील नाहीत. वापरलेल्या सॅनिटरी पॅडचा कचरा कुत्रे, मांजर, गाई, ढोरे, मुके प्राणी खातात त्यामुळे ते आजारी पडतात. इतकेच नव्हे तर मासिक पाळी मध्ये महिलांचे जे रक्त स्त्राव होतो त्याचा वास जंगली जनावरांना फार लवकर मिळतो आणि ते त्यांचे आवडते खाद्य ठरते. म्हणून आपण जंगली मुक्या जनावरांचा जीव देखील धोक्यात घालतोय या गोष्टीकडे देखील आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. 


मग....


  कोणते सॅनिटरी साधन वापरावे?


     बर्‍याच महिला मासिक पाळीच्या दरम्यान डिस्पोसेबल सॅनिटरी पॅड वापरतात. ह्या सॅनिटरी पॅडमध्ये भरपूर प्रमाणात केमिकॅल्स आणि प्लास्टिकचा वापर केला जातो परंतु बाजारात सॅनिटरी पॅड विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या पाकिटावर ते पॅड कोणत्या घटकापासून बनले आहे ते नमूद करत नाहीत त्या कारणांमुळे आजकालची महिला अनेक आजारांना स्वतःहून सामोरे जातेय, जसे आपण सॅनिटरी पॅड वापरतो आणि उघड्यावर फेकून देतो ते सॅनिटरी पॅड वापरा व फेका ( USE and THROUGH) असे असतात. महिलांनी वापरलेले सॅनिटरी पॅड कुठे टाकावे, त्यांची पूर्णपणे विल्हेवाट कशी लावावी आणि जर आपण ते जाळले तर त्यातून विषारी वायू केमिकल बाहेर येतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर फार परिणाम होतो याबद्दल कोणीच काही बोलत नाही. म्हणूनच आम्ही जाजागृतीच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.
महिलांनो, वेळीच सावध व्हा ! आजाराला आमंत्रण देऊ नका , घंटा धोक्याची आहे !!


  महिलांनी काळजी कशी घ्यावी व कोणते सॅनिटरी साधन वापरावे:
    मेंस्ट्रुअल कप ( मासिक धर्म कप ):


    मेंस्टुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलिकॉन पासून बनलेले एक वैद्यकीय साधन (Medical Device) आहे. हे अतिशय लवचिक असल्यामुळे वापरण्यास अगदी सोपे आहे. आरोग्यास लाभदायक, 12 तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेकशन, अनेक वर्ष सहज पुनर्वापरास योग्य, पर्यावरणपूरक, परवडणारे असे आहे. मेंस्ट्रुअल कप सोबत आपण धावू शकता, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम/ योगा करू शकता, काळजीपूर्वक वापर  केल्यास एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे 5 ते 6 वर्ष वापरता येतो, मासिक स्त्राव त्वचेच्या संपर्कात येत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जंतुसंससंक्रमण होत नाही, कसलीही दुर्गंधी नाही.



   कापडी पॅड:
हे कापडी पॅड म्हणजे जुन्या काळातील कापडी घड्या नसून ते अतिशय मऊ, टिकाऊ आणि श्वास घेण्यायोग्य फॅब्रिक पासून बनलेले असतात,  अँटीमाइक्रोबियल तंत्रज्ञानासह कायमस्वरूपी बोन्डेड असतात, फॅब्रिकवर पॉझिटिव्ह चार्ज लेयर असतात, पटकन वाळते, अत्यंत उच्च प्रतीचे कापड असल्यास अधिक शोषून घेते आणि त्यामुळे कोरडे आणि आरोग्यदायी मासिक पाळी चा अनुभव देते. असे अनेक कापडी पड बाजारात उपलब्ध आहेत. हे कापडी पॅड धुऊन पुन्हा वापरता येतात. कापडी पॅड वापरायला अगदी सॅनिटरी पॅड सारखेच असतात व धुवायला हि खूप सोप्पे असतात. ते कोणत्याही ऋतू मध्ये लवकर वाळून जातात व पुन्हा वापरण्यासाठी उपलब्ध असतात. एक पॅड चा सेट 3 ते 4 वर्ष एक महिला वापरू शकते. म्हणजे पैशाची बचत, उत्तम आरोग्य, प्राणीमात्रांना कोणताच धोका नाही त्याचबरोबर पर्यावरण सृष्टी देखील चांगली राहील.


चला तर मग आपण सर्व मिळून आजच्या जागतिक मासिक पाळी स्वचता दिनानिमित संकल्प करूया कि, मी आजपासून आरोग्यास चांगले आणि पर्यावरणास पूरक असेच सॅनिटरी साधन वापरेल आणि माझे आयुष्य आणि पर्यावरण जपण्यास मदत करेल.


                             ------------------------------------------------


आज मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छतेची काळजी कशी घ्याल , ज्यामुळे इंफेक्शन होणार नाही, पर्यावरण अबाधित राहील, आरोग्य निरोगी राहील, मुक्या जनावरांना त्रास होणार नाही....त्याबद्ल मी सर्व माता भगिनींना काही विशेष टिप्स देणार आहे. 


जाणून घ्या खालील टिप्स...
सॅनिटरी पॅड तपासा: आपण जे सॅनिटरी साधन वापरतो ते आवर्जून तपासा ते बनवण्यासाठी कोणते घटक वापरले आहेत ते वाचावे, पॅड हातात घेऊन त्यावरील आवरण हे प्लास्टिक चे तर नाही ना याची शहनिशा करा जर तसे असेल तर ते वापरणे बंद करा त्यामुळे त्वचेचा cancer होऊ शकतो या सर्व  गोष्टीची खार्त्री करूनच वापरा. बाजारात अनेक चीनी कंपनी चे पॅड उपलब्ध आहेत त्यामुळे विचारपूर्वक सर्व गोष्टी तपासून वापरा.   
• हे सॅनिटरी साधन वापरा : मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त मेन्स्त्रुअल कप व कापडी पॅड वापरा त्यामुळे भविष्याचा धोका टळेल, आरोग्य निरोगी राहील, पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल. 
• वेळोवेळी सॅनिटरी पॅड, कापडी पॅड, मेन्स्त्रुअल कप बदला - मासिक पाळीदरम्यान वापरण्यासाठी बाजारात सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन आणि मेंस्ट्रुअल कप सारखे पर्याय उपलब्ध आहेत. जास्त वापर महिला सॅनिटरी नॅपकिनचा करतात. पाळीदरम्यान, पॅड वेळोवेळी बदलणं आवश्यक आहे. प्रत्येक ५ तासांनंतर पॅड बदलणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. ज्या महिला, मुली टॅम्पॉनचा वापर करतात त्यांनी ते दर २ तासांनी बदलावं. ज्या महिला मेन्स्त्रुअल कप वापरतात त्यांनी देखील दर ६ ते ८ तासात कप रिकामा करावा.
• गरम पाण्यानं आंघोळ करावी - मासिक पाळी दरम्यान गरम पाण्यानं आंघोळ करावी. असं केल्यानं आपल्या शरीर शेकलं जातं आणि खूप आराम मिळतो. तसंच शरीराचा फ्रेशनेसही वाढतो. शरीरातील दुर्गंध गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं निघून जातो.
• योनी मार्गाची स्वच्छता -मासिक पाळी दरम्यान आपल्या योनीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. स्वच्छ धुतल्याने योनीतील वास निघून जातो आणि इंफेक्शनही होत नाही.
• मासिक दिनचक्र: मासिक पाळी मध्ये दररोज दोनवेळा कोमात पाण्याने अंघोळ करा, सुटसुटीत मोकळे कपडे परिधान करा, हलकासा योगा करा, योग्य आहार घ्या आणि आवडतील अश्या छोट्या छोट्या गोष्टीत स्वतःचे मन रमवा, कमीत कमी काम करा आणि दिवस आनंदाने घालवा.
• कपडे व चादर नियमितपणे धुवावी - मासिक पाळी दरम्यान परिधान केलेले कपडे व अंथरुणावरील चादर बदलणं आणि स्वछ धुणं गरजेचं आहे. त्यानं स्वच्छता राखली जाते. शिवाय गरज असल्याचं मासिक पाळीत नियमित अंडरविअर बदलावी, त्यानं खाज आणि इंफेक्शन होत नाही.
                                                                                कृपया अधिक माहितीसाठी
श्री.भुषण शिरूडे
+९१ ७०२०४३८८८१ / ८२७५३२०४६५  यांच्याशी संपर्क साधा 
Website: www.medlifefoundation.org 
Email Id: medlifefoundationbahal@gmail.com