शासन आपलं मायबाप असतं कवी - नंदू तळकर

 


कोरोना व्हायरल होतो म्हणून 
उगाच भय बाळगायचं नाही
कुणी काहीही सांगतात म्हणून 
खोटी अफवा पसरवायचं नाही       ||


मनगटात बळ आलं म्हणून
रस्त्यावर मोकाट हिंडायचं नाही
ओठात शब्द फुलतात म्हणून 
बाण बनू द्यायचं नाही                    ||


क्वाॕरंटाईन झालेत म्हणून 
नात्याला कधी विसरायचं नसतं
परप्रांतीय मजूर म्हणून 
राष्ट्रीयत्वाला कधी टाळायचं नसतं    ||


सेवाधर्माला जपतात म्हणून
त्यागाला सलाम करायचं असतं
धैर्य, संयम, शिस्त पाळून
आपणच सहकार्य करायचं असतं    ||


आयुष्य हे असचं असतं
कुठून सुरु होत ते कळत नसतं
संकटाच्या काळातही
शासन आपलं मायबाप असतं        ||


                      
                      


                  
 पत्ता ः- नंदू तळकर, अलिबाग-रायगड 
              ९९२२११९२२४