गुड मॉर्निंग लेखिका - सुजाता पाटील

 कोव्हीड १९ वर आधारित कथा


लघुकथा- 


(कथा ‌पुर्णपणे काल्पनिक आहे .)


       मानसी सकाळपासून थोडी  upset  वाटत होती . हातात मोबाईल घेऊन डायनिंग वर नाश्त्याला बसली होती जरूर......पण काही केल्या तिच चित्त स्थिर होत नव्हतं . 
      तेवढ्यात तिच्या आईने ‌मस्त‌‌ दोघींसाठी गरमा गरम ‌उपमा आणला . तुपाची तकाकीन चमकणाऱ्या त्या म ऊ लुसलुशीत व्हेज उपम्यामधून लालबुंद गाजाराचे तुकडे ,, हिरवेगार वाटाणे, बिन्स , कोबीचे डोकावणारे अगणित तुकडे आणि मंद मंद दरवळत जाणारी गरमागरम वाफ . व्वा तिला बघताच तोंडाला पाणी सुटलं . 
पण, लगेच ती एवढुस तोंड करत आणि मोबाईल जरा रागानेच बाजूला ठेवत आईला म्हणाली . ,, "आई बघ ना, नाना देशपांडेंचा आठ दिवस होत आला ... गुड मॉर्निंग चा मेसेज नाही . खरंच लोक गुड मॉर्निंग ची सवय का लावतात काही कळत नाही . 
आई उपीटाचा घास तोंडात घालत म्हणाली ..... ..."अग पण हे आहेत कोण  ...नाना देशपांडे ?"‌
मानसी- (आश्चर्याने आईकडे बघत)   ‌‌  अग माझ्या आॅफिसधला चिन्मय ‌देशपांडे‌ ...तुला माहित आहेच ना ,,त्याचै हे वडील .  ,one and half year ago आमचा सगळा काॅलेजचा स्टाफ बोरीवलीला त्याच्या घरी बडे् सेलिब्रेशन ला गाडी करून गेलेला आठवत ना !! (डोळे मोठे करून)
आई‌ (काहीस आठवत) अरे हो हो!!
     तेव्हा माझी व नानांची पहिली   भेट झाली . रेल्वे तून रिटायर झालेलै नाना ....पु .ल. चे चाहते .
मग आई लगेचच  हसत पुढे म्हणाली..... आणि ‌तू पु. लं ची भक्तीण ....चहा चा शेवटचा घोट पिला ‌व आई कप खाली ठेवत म्हणाली ...."झाली असणार मैत्री,  दिला आसणार व्हाटसप नंबर ‌"
 मानसी.. (हसत)अगदी बरोबर !
तेव्हापासून ते मला न चुकता रोज सकाळी गुड मॉर्निंग चा मेसेज पाठवतातच . शिवाय पुलं चे फोटो , पुलं चं लिखाण . विडिओ ....
एवढच काय आई .... चिन्मय कडून पुस्तक ही पाठवलं बोल त्यांनी .
 (पुढें विचार करत परत म्हणाली )....कधी फोन वर बोललो नाही आम्ही.‌पण बर वाटत त्यांचा गुड मॉर्निंग चा मेसेज पाहून . आता त्यांच्याशी एक वेगळं नात तयार झालय .
आणि गमतीत ते सर्व फेसबुक फ्रेंड स  डि. आर. म्हणत.....
आई- (डोळे प्रश्नार्थक करून)‌ म्हणजे??
मानसी (जोराने हसून टाळी वाजवत) म्हणजे डिजिटल रिलेशन . ते मला गुड मॉर्निंग डिआर असे रोज म्हणतात .
आणि हो आई ...(डोळे मोठे करून आश्चर्याने) समज सकाळी यदाकदाचित वेळ नाही मिळाला तर gf, gnकिंवा ge, चा तर मेसेज पाठवतातच . नाना म्हणजे ग्रेट . फेसबुक वरचे ते एक 'वल्ली' आहेत . (हवेत हात वारे करत ती आईला नानांच जमेल तितकं कौतुक सांगत होती)
नवोदित लेखकांना नानांच्या  कमेंट म्हणजे साक्षात सत्यनारायणाचा प्रसाद वाटतो . इतक बारकाईने ते वाचून योग्य समीक्षण करतात .
आई अगदी लेकीच बोलण हनुवटीवर दोन्ही हातांची मुठ ठेवून लक्षपूर्वक ऐकत होती . डोळे बारीक तर कधी मोठे करून .
मानसी पुढे म्हणाली, नानांची भटकंती ही खूप ... सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची अचूक माहिती . (आपल्या ‌लांबसडक केसांचा जोरात ‌झटका मारत ... पुढे म्हणाली,,..)
शिवाय वाचन अफाट .  खवय्येगिरीत ही अव्वल....असे हे अष्टपैलू नाना !!
(एकदम चमकून आणि उडी मारून मानसी  खुर्चीवरून उठत म्हणाली) ," आई! हे लाॅकडाऊन संपल ना की आपण त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवू . मग तुझी ही ओळख होईल .
आई-  (एकदम खुश होऊन)अग चांगली कल्पना आहे.
आई उठून डायनिंग वरच्या प्लेटा उचलत म्हणाली ...."तू चिन्मयला फोन करून बघ"
मानसी...अग केला" !!
आई- अरे , मग काय बोलला?‌
मानसी- तो म्हणाला ,मानसी मी तुला स्वत: हून फोन करतो दोन दिवसांनी . आणि सांगतो. चार दिवस झाले तरी फोन नाही.
आई- (गडबडीने) तू आता कर फोन चिन्मयला बघ काय म्हणतो?
मानसीने चटकन फोन उचलला आणि फोन केला, रिंग वाजू लागली .
चिन्मय- बोल मानसी .
मानसी- अरे चिन्मय वेडा आहेस काय . अरे तुझ्या बांबाच व्हाटसप चालू नाही . गुड मॉर्निंग चा मेसेज नाही . इतकी सवय झालीय ना त्यांच्या गुड मॉर्निंग ची . असं वाटतं काहीतरी हरवलं आहे जे मिळाल्या शिवाय चैन नाही पडणार . (काहीवेळ चिन्मय तिकडून काहीच ‌बोलेना )
मानसी चिंतातूर होऊन.‌...अरे! बोल ना गप्प का . what happened? is everything alright ?
चिन्मय-( गदगदत्या स्वरात ) मानसी आता कधीच तुला त्यांचा "गुड मॉर्निंग" चा मेसेज येणार नाही . घरातील आम्हा सगळ्यांना कोरोंटाईन केलं आहे . now he's no more. 
हे ऐकताच बाहेर आसमंतात चालणाऱ्या वळीव पावसांच्या विजांनी तिच्या डोक्यात ही थैमान घातलं. 
पण तो शाब्दिक धक्का सहन करत ती हातातील फोन घट्ट पकडत आपल्या श्वासांचे हुंकार एकटक ऐकू लागली .
चिन्मय पुढे …



लेखिका - सुजाता पाटील