साप्ता. लोकनिर्माणचे  ११ वे वर्ष आणि   कासारसाहेबांच्या ३३ व्या लग्न वाढदिवसानिमीत्ताने घेतलेला आढावा - लेखक, शांताराम गुडेकर 

 


 



*लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार* यांच्या
*११ व्या वर्षाची यशस्वी वाटचाल आणि १२ व्या वर्षात पदार्पण*


*तर आज त्यांच्या लग्नाचा ३३ वा वाढदिवसही*


बरोबर ११ वर्षापुर्वी साप्ता. लोकनिर्माण  या वृत्तपत्रसृष्टीत पदार्पण झाले.आज हा मधला ११ वर्षाचा कालावधी पुर्ण करून लोकनिर्माण  एका नविन  वाटचाल करित आहे. तेव्हा सर्वप्रथम संस्थापक-संपादक, जेष्ठ पत्रकार-मार्गदर्शक बाळकृष्ण कासार सर आणि लोकनिर्माण मधील सर्वच सहका-यांचे हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन !!हार्दिक अभिनंदन !!!तर ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित मनःपूर्वक शुभेच्छा....! 


     या ठिकाणी कासारसाहेबांचे कौतुक या मनोगतामधून केवळ माझे जवळचे मित्र,गुरुवर्य,मार्गदक म्हणून करायचा  माझा उद्देश नाही तर पत्रकारिता कशी असावी ती कशी करावी हे त्यांनी साप्ता.लोकनिर्माण च्या माध्यमातून  सर्वाना दाखवून दिले आहे. अनेक दर्जेदार वर्तमानपत्रात त्यांनी कामही केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील लोकनिर्माणच्या वाचकांना याचा प्रत्यय आला असेल. येत आहे.भविष्यकाळीन वाटचालीत येईलच. साप्ता.लोकनिर्माण ला झालेली ही ११ वर्षे  ध्येयवादी अन् स्वाभिमानी पत्रकारितेची आहेत. आपल्या लेखणीचा गैरवापर होऊ न देता तीचा समाजहितासाठी, प्रबोधनासाठी-परिवर्तनासाठी कसा जास्तीत जास्त उपयोग होईल याकडे संपादक म्हणून बाळकृष्ण कासारसाहेब यांनी प्राधान्याने लक्ष दिले. कुणाचा मुलाहिजा न ठेवता निडरपणे लेखणीद्वारे अनेकांना डोस दिले तर कित्येकांना तिच्या 
फटका-याने घायल केले/करत आहेत. यापुढे ही असेच फडके बसणार यात शंका नाही.खरतर वृत्तपत्र चालविणे खर्चिक बाब असते. मोठी वृत्तपत्रे त्यांच्या पत्रकारितेच्या दर्जाप्रमाणे  तितक्याच मोठया जाहिरातींच्या पॅकेजेसनी तगून असतात वा तगून राहतात.मात्र स्थानिक पातळीवरच्या मासिक,पाक्षिक, साप्ताहिकांच्या दृष्टीने प्रत्येक अंक काढणे म्हणजे अवघड असते. इतरांप्रमाणे साप्ता.लोकनिर्माण देखील यास अपवाद नाही. कित्येक प्रसंग येऊन देखील लोकनिर्माण च्या अंकामध्ये खंडीतपणा येऊ दिला नाही. त्यामुळे पुन्हा कासारसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदनासह शुभेच्छा ! अनेक  राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले असून एक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.   सामाजिक कार्यात सहभाग, कुठेही भटकंती आणि या सगळ्यांमधून वेळ काढून पुन्हा  दर आठवड्याला साप्ता.लोकनिर्माण  अंकाचा जन्म...हे सगळ या संपादक महोदयांना कस जमतं कुणास ठाऊक..??  मुख्य बाब म्हणजे या ११ वर्षात  वाचकांना  लोकनिर्माण ने फक्त आठ पानी अंक दिले नाहीत तर राष्ट्रीय, सांस्कृतिक सणवार तसेच वर्षातील विशेष दिनांवर " विशेषांक" काढून वाचकांना त्याच्यातील दर्जेदार लेखांनी तृप्त केले. महाराष्ट्रात भले अनेक साप्ताहिके आज निघत असतील मात्र त्यांच्या मध्ये "साप्ता.लोकनिर्माण " चा वेगळेपणा नक्कीच उठून दिसतो पुढे दिसेल.गेली ११ वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे साप्ताहिक भविष्यात आणखीन गरूडझेप घेत राहो याच सदिच्छा या वर्धापनदिनी.१२ व्या वर्षातील पदार्पण आणखीनच दर्जेदार व्हावे ही श्री मार्लेश्वर चरणी प्रार्थना !


*शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर* (पत्रकार-दै.तरुण भारत संवाद )
(मंत्रालय प्रतिनिधी - सा. लोकनिर्माण*
*सदस्य- महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन


*सोशल मिडिया- महामित्र 


*मा.वि.का.अधिकारी (महाराष्ट्र शासन)


*सदस्य -  महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्य


*सदस्य - एन विभाग क्षेत्र-३/ नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र शासन


*सदस्य -मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबई.