संपादक कोविड योद्धा !! कवी -- विलास ह.ल. देवळेकर


                               २८ मे २०२०


समाजाच्या न्याय हक्कासाठी
       आपल्या वृत्तपत्रकांत मांडूनी
समाजकारण आणि राजकारण
        लोकांसमोर दाखवूनी
भारतातील पहिले न्युज चॅनेल वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! १ !!


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
      विविध विषयांवर लिहिणारे
सामाजिक जनहितार्थ प्रश्नाला
       साप्ताहिकात मत लिहिणारे
११ जिल्ह्यात एकाच दिवशी अंक प्रकाशित वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! २ !!


आपले पहिले ई- वृत्तपत्रकात
        कोरोना व्हायरस ची माहिती देणारे
जनजागृती आणि समाजसेवा
       गरिबांना अन्नदान करणारे
खरे चौथा पत्रकारितेचा स्तंभ वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ३ !!


आपल्या लिखाणाची दखल
        भारतीय महाक्रांती सेवाने
कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्राने
         जाहीर केले गौरवाने
आम्ही आपले आहोत अभिमान वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ४ !!


लोक निर्माण वृत्तपत्रकाच्या ११ वर्षात
      लेखणीचा ना केला गैरवापर
समाजहित- प्रबोधन- परिवर्तन साठी
          आपण जनसंपर्कांचा केला सद् वापर
कवितांना सन्मान देणे वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ५ !! 


निडरपणे आपण लेखणी द्वारे
        दिले काहींना चांगले डोस
त्याच लेखणीच्या फटकाऱ्याने
         इतर घायाळ झाले, दिले हृदयाला डोस
लेखकांच्या लेखचा आदर करने वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ६ !!


मिळाले आपणांस संपादकीय
       राष्ट्रीय- राज्यस्तरीय अनेक पुरस्कार
आहात शासनाचे अधिस्विकृती धारक पत्रकार
        आपले पत्रकारितेत कोणी ना करे तिरस्कार
आपण पद्धतीशीर काम करणे वाले 
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ७ !! 


आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा
        वृत्त सेवा चा हा सन्मान आहे
आणि आपण पत्रकार- साहित्यिकांना
        संधी देता हा नवोदितांचा बहुमान आहे
सर्वांना सहकार्य- प्रसिद्धी देणे वाले
संपादक कासार सर आपले अभिनंदन !! ८ !!


सर, आपली अशीच प्रगती होत राहो, हि शुभेच्छा ! 🌹
आणि आपल्या अंकाचा दर्जा वाढत जावो, ही सदिच्छा !! 👍 


जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या माणसाच्या निर्धार
         तोच खरा घरात बसून
कोरोनाच्या विरोधात लढा देऊ शकतो आधार


         हे हि दिवस जातील !! 


              आपल्या अंकाचा दास 🙏
                     कवीदास
‌            विलास ह.ल. देवळेकर
                      मुंबईकर