स्वातंत्र्यसैनिकांना भोगाव्या लागलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेची आठवण करा !  लॉकडाऊन फारच सोपे वाटेल .  युयुत्सु आर्ते , सामाजिक कार्यकर्ता

 



     भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन विविध आंदोलनात भाग घेत होते . त्यातील अनेकांना इंग्रज सरकारने मोठ्या कालावधीच्या , जन्मठेपेच्या , काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली होती . या शिक्षा खूप भयानक स्वरुपाच्या होत्या . स्वातंत्र्यसैनिकांना अशा शिक्षा भोगताना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या . या शिक्षा कधी संपतील की न संपताच मृत्यू येईल याची कोणालाही खात्री नव्हती . या शिक्षेत - . . अनेक वर्षाच्या कालावधीचा समावेश असे . • अंधार असलेल्या खोलीत राहण्याची व्यवस्थित व्यवस्था नसे . खोलीला कुठेतरी उजेडासाठी झरोका असे . मेहनतीची कामे करुन घेण्यात येत असत . निकृष्ठ दर्जाचे जेवण देण्यात येत असे . • सर्व हालचालींवर इंग्रज अधिकाऱ्यांचे लक्ष असे . • इतरांशी अथवा नातेवाईकांशी संपर्क साधण्याची कोणतीही व्यवस्था नसे . कोणत्याही प्रकारच्या करमणुकीची साधने उपलब्ध नसत , • यातून सुटका की मृत्यू याची खात्री नसे .
        याउलट कोरोना विरुद्ध लढ्यात लॉकडाऊन हा अतिशय सोपा मार्ग अवलंबिण्यात आला असून या कालावधीत - • स्वतःच्या घरात रहाणे . संपूर्ण कुटुंबासमवेत रहाणे . • आवडीचे पोटभर जेवणे . • भरपूर विश्रांती घेणे हालचालींवर कोणाचेही लक्ष नाही . मोबाईल , टी.व्ही . व इतर सर्व करमणुकीच्या साधनांचा वापर करणे शक्य अंगमेहनतीचे काम करण्याचे बंधन नाही • लॉकडाऊन अत्यल्प ४०-५० दिवसांचा कालावधी अशा त - हेने जनतेने एका बाजूला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या पद्धतीच्या हालअपेष्टा सहन केल्या आहेत त्याची आठवण केली व ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी वर्षानुवर्षाचा कालावधी वेळप्रसंगी संपूर्ण आयुष्य उध्वस्त करुन घेतले हे एका बाजूला व आपण स्वतःच्या , कुटुंबाच्या व समाजाच्या हितासाठी , जिवंत राहण्यासाठी ४०-५० दिवसांचा किरकोळ कालावधी घरात आनंदाने काढायचा ठरवले तर लॉकडाऊन आपल्याला फारच सोपे वाटेल . देशासाठी आयुष्य वेचणारे , हालअपेष्टा सहन करणारे स्वातंत्र्यसैनिक या मातीत जन्माला आले होते तर मी स्वतः जिवंत राहण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी यंत्रणेच्या सूचनेप्रमाणे घालवून कोरोना विरुद्धची लढाई निश्चित जिंकेन अशी प्रतिज्ञा करणे आवश्यक आहे.


 


युयुत्सु आर्ते 


सामाजिक कार्यकर्ता


मु.पो.देवरुख. मोबा .9422151926 / 7798745498