जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने आँनलाईन जागर

 



मुंबई(शांत्ताराम गुडेकर )



        स्वापक नियंत्रण ब्युरो-भारत सरकार मुंबई शाखा, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई व आयना ग्रुप यांच्या संयुक्त विद्दमाने आतंराष्ट्रीय अंमली पदार्थ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जंयती आणि वाहतूक विरोधी दिन व सामाजिक न्याय दिनानिमित्ताने फेसबुक लाईव्ह वेबीनारच्या माध्यमातून आँनलाईन जागर कार्यक्रम घेण्यात आला."कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम प्रत्यक्ष न होता वेबीनारच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही न चुकता सादर झाला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय भाऊ मुंढे यांनी संदेशा द्वारे शुभेच्छा दिल्या. यामध्ये ते म्हणाले, महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि सरकार कटिबद्ध असल्याचे आपल्या संदेशात सांगितले.



     यावेळी या विषयावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या विविध मान्यवरांंनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले.या वेबीनारला उगम दान चरण, संचालक  स्वापक नियंत्रण ब्युरो-मुंबई यांनी अंमली पदार्थ व त्याचे प्रकार व एन डी पी एस कायदा या विषयावर सविस्तर माहिती दिली. अन्न व औषधी विभाग यांची भुमिका कृती कार्यक्रम व सामाजिक संस्था यांच्या अपेक्षा याबाबत जुगल किशोर मंगी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी विभाग, महाराष्ट्र यांनी आपले विचार मांडले. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम या विषयी डॉ.अजीत मगदूम, संचालक अन्वय व्यसनमुक्ती केंद्र ,मुंबई यांनी आपली भुमिका विशद केली. मानसोपचार तज्ञ डॉ.धरव शाह यांनी समुपदेशन द्वारे उपचार याची माहिती व्यक्त केली. कृपा फाऊंडेशनचे  बॉस्को डेसुजा, राष्ट्रीय प्रोग्राम डायरेक्टर यांनी अंमली पदार्थाचा देशाला विळखा याबाबत अमली पदार्थाच्या व्यसनांची देशातील आकडेवारी सांगितली. दिपक पाटील, व्यवस्थापक सलाम बाँम्बे फाऊंडेशन यांनी  'तंबाखू से ड्रग्स तक ' या विषयावर व्यसनाचा प्रवास सांगितला. सामाजिक संदेश डॉ.अजादर खान सन फार्मासिटिकल लिमिटेड देश भारत त्यांच्या कामाबद्दल यांनी माहिती दिली. या वेबीनारचे सुत्रसंचालन नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल स.भा.मडामे आणि मान्यवारांचा परिचय नारायण लाड सलाम मुंबई चे मुंबईचे प्रमुख यांनी उत्कृष्ट पणे केले. २६ जून जागतिक अमली पदार्थ मुक्ती शपथ नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली. सदर कार्यक्रम आयोजन साठी सन फार्मासिटिकल यांच्या वतीने सामाजिक योगदान देण्यात आले.  नेहमी प्रमाणे या कार्यक्रमात कलाकारांनी ११.३० ते ११.४५ यावेळेत मंडळाच्या वतीने अभिनेते अक्षय कुमार, सोनू सुद, पुल्लकित सम्राट, अनुराग शर्मा, सिध्दार्थ जाधव नशामुक्ती ब्रँड अम्बेसीडेर व खेळाडू जहीर खान यांनी व्यसनमुक्तीचा तरुणांना आणि अंमली पदादार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांना संदेश प्रत्यक्ष सहभागाने दिले. संगीतकार गंधार जाधव यांचे स्वरबद्धित  " SAY NO TO DRUGS*  video  गीताचे लाँचिंग केले गेले. या गीतामध्ये अधिकारी ,पत्रकार,विद्यार्थी, नृत्यकार, टी.वी. शो कलाकार, बालक, कवी, यांचा समावेश आहे.


    नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने राज्यभर नशांबंदी मंडळ जिल्हा संघटक यांनी आपापल्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या विरोधी जनजागृती केली. अशी माहिती मंडळाचे संघटक प्रतिनिधी सौ. दिशा कळंबे यांनी दिली.मुंबई जिल्ह्यात मुंबई विभागीय संघटक प्रियांका सवाखंडे, भिमराव गमरे, दिशा कळंबे तसेच ठाणे- कल्याण विभाग संघटक सुनील चव्हाण आणि पालघर संघटक मिलिंद पाटील येणाऱ्या  २६ जुन ते १० जुलै, २०२० या काळात महाराष्ट्रात विविध स्पर्धांचे आयोजन करणार आहेत. कोरोनाचे संकट पाहता काही ठिकाणी ह्या स्पर्धा  ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येतील. त्याचबरोबर या आयोजनात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयाना ग्रुप मधील सलाम मुंबई, जमाते इस्लामी हिंद, प्रजापिता ब्रह्माकुमारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जीवनधारा, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, किन्नर माँ, आदर्श फाऊंडेशन, कृपा फाउंडेशन, ब्राईट फ्युचर या सर्व संस्थांचाही सहभाग आहे. अशी माहिती वर्षा विद्या विलास आणि अमोल मडामे यांनी दिली आहे.