सीबीएसई माध्यमाचा दहावी चा निकाल जाहीर, जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला

 

रत्नागिरी लोकनिर्माण टीम 

सीबीएसई माध्यमाचा दहावी चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला आहे.दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १६ शाळेतून ३९३ विद्यार्थी, ३३८विद्यार्थिनी मिळून एकूण ७३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७१६ विद्यार्थी पास झाले असून १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 

जिल्ह्यातून शिवम बेंद्रे ( नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी) याने ९८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केवल खापरे (रोटरी स्कूल, खेड) याने ९७.२७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अभिषेक पाटील ( पोतदार स्कूल, रत्नागिरी) याने ९७.६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सीबीएसई माध्यमाच्या जिल्हा समन्वयक नजमा मुजावर यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image