सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा
चंद्रभागेतीरी ओस पडे डोंगा
टाळ मृदंगा चिपळी हाती
वारकरी रिंगारिंगा नाचती
तुयशी घेती डोक्यावरी
भक्तीन निंघाली पंढरपुरी
सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा
चंद्रभागे तीरी ओस पडे डोंगा
हरेक वरसाची ही वारी
भान ईसरुन नाचे वारकरी
संगे नाचे बेभान ईठूमावली
रुखमाई कौतुके पदर सावरी
सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा
चंद्रभागे तीरी ओस पडे डोंगा
चंद्रभागेच्या वाळुकिनारी
ताल धरुनी नाचे वारकरी
पुंडलीक मायबापाची सेवाकरी
ईठ्ठल उभा युगे अठ्ठावीस ईटेवरी
सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा
चंद्रभागे तीरी ओस पडे डोंगा
पंढरीची लागली जीवाले अास
"ईठ्ठल" भरला उरी श्वासात श्वास
कोरौनान उच्छाद मांडला
वारकरी तुह्या वाटेले मुकला
"सावळ्या ईठ्ठला"देवा पांडुरंगा
चंद्रभागेतीरी ओस पडे डोंगा
माह्या ईठ्ठल दिसे पानापानातुन
वारकर्याच्या सुन्यासुन्या घरातुन
बईराज्याच्या घामाघामातुन
अात्माराम होवुनी रमे तनामनातुन
सावळ्या ईठ्ठला देवा पांडुरंगा
चंद्रभागेतीरी ओस पडे डोंगा
🌹रामदास गायधने🌹
खांदा काॅलनी
नवीन पनवेल