पुणे लोकनिर्माण विनायक दोरगे
यवत (दौंड) - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले . निष्पाप पर्यटकांचे या भ्याड हल्ल्यात प्राण गेले. या घटनेच्या निषेधार्थ दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमले होते.निदर्शकांनी निषेधाचे फलक हातात घेत संपूर्ण गावातून निषेध मोर्चा काढला,पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत सर्वांनी घटनेचा निषेध नोंदवला तसेच केंद्र सरकारने दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी अशा घोषणा दिल्या.
यावेळी ह भ प दीपक महाराज मोटे यांनी बोलताना सांगितले की,तरुणांनी सोशल मीडियावरील धार्मिक अफवांवर विश्वासू ठेवू नका.कुराण ज्यांना कळत त्यांच्या हातात कधीच हत्यार येऊ शकत नाही.निषेध नोंदवण्यासाठी मुस्लिम समाजाचा सहभाग हिंदू समाजापेक्षा जास्त आहे.अशा घटना घडून देखील हिंदु समाजाची उदासीनता पाहून खेद वाटतो असे मोटे यांनी सांगितले.समीर सय्यद यांनी अतिरेक्यांना धर्म नसतो.कुराण मानणारे मुस्लिम निष्पाप लोकांचा जीव घेऊच शकत नाही.काही लोकांना वाटते की अशा घटना घडल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लिम तणाव वाढेल परंतु भारतातील मुस्लिम अगोदर भारतीय मुस्लिम आहेत.भारतातील हिंदू-मुस्लिम संकट काळात कायम एकमेकांच्या मदतीला येतात असे म्हणत पहलगम घटनेचा निषेध केला.यावेळी स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना,सर्व धर्माचे नागरिक यांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना कँडल मार्च करत श्रद्धांजली अर्पण केली.