डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी

 पनवेल/लोकनिर्माण न्युज 


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमाने दगडफेक करून कुंड्यांची तोडफोड करून समस्त आंबेडकरी जनतेचे अस्मितेवर हल्ला केला.याच्या निषेधार्थ कामोठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने त्या समाजकंटकाला तात्काळ अटक करून त्या मागे कोण खरा सूत्रधार आहे त्यालाही अटक करून कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन कामोठे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम यांना देण्यात आले.



यावेळी रिपाईचे कामोठे शहर युवक अध्यक्ष आशिष कदम, पनवेल तालुका उपाध्यक्ष  अनिल जाधव, युवा सरचिटणीस अभिजित कांबळे, सुनील जाधव, विनोद जाधव, अमोल जाधव, विनोद गमरे, अनंत सावंत उपस्थित होते.