- सं - पा - द - की - य - ★★ कोकणचा विकास, हाच आपला ध्यास


                  दिनांक १५/१०/२०२०


        कोकणातील युवा पिढी ही शहराकडे आकर्षित झालेली असून कोकणात अजूनही उद्योग धंदे हे पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेले नसल्यामुळे खेड्यातील तरुण, शिक्षित पिढी मुंबई, पूणे, बंगलोरकडे जात असताना दिसत आहेत. पोटापाण्यासाठी *'तिर्थाटन करण्यापेक्षा देशाटन करणे'* ही काही चुकीची गोष्ट नाही.आपल्या शिक्षणाने झालेल्या बुध्दीचा विकास हा अजून आत्मनिर्भय झालेला नाही. आत्मनिर्भय होण्यासाठी आज संपूर्ण जग एका क्लिकवर  (हाताच्या बोटावर)   आलेले आहे. प्रसारमाध्यमांमुळे तर व्यवसायिक गणिते बदलू लागली आहेत. परिवर्तनाच्या वेगळ्या लाटेवर स्वार होऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भौगोलिक सिमारेषा जरी धुसर झाल्या असे वाटत असले, तरी त्या सिमारेषांचे महत्व कमी होत नाही. आपला कोकण हा निसर्गरम्य वातावरणातील एक नैसर्गिक देणगी असल्यामुळे त्या परिसराचे जतन, चाली-रिती, रुढी-परंपरा, सण-उत्सव या शाबूत ठेवून आपल्या सभोवतालचा परिसर, शहर सुजलाम सुफलाम कसा ठेवता येईल याकडे आता कोकणातील युवा पिढीने पाहिले पाहिजे.
        आज आपण ज्या विभागात, शहरात नोकरीसाठी जात आहोत किंवा उद्योग वा व्यवसाय करत आहोत, तो विभागही त्याकाळी मागासलेला होता. दळणवळणाची साधने ही  समुद्रमार्गाने होत असल्यामुळे तेथील शहराचा विकास झालेला आहे. मात्र आपल्या शासनाच्या ध्येय धोरणामुळे खेड्यातील भौगोलिक परिसर अविकसित ठेवलेला आहे . पुरोगामी महाराष्ट्राने आज प्रत्येक जिल्ह्या-जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प आणलेले आहेत. नॆसर्गीक. कोकणात केमिकल झोन निर्माण करुन असे प्रकल्प कोकणचा विकास करण्यासाठी नसून भोैगोलिक निसर्गाचे वरदान असलेल्या  कोकणाची दुर्दशा करण्यासाठी असून, जेणेकरून  असे प्रदुषण करणारे कारखाने हे या गरीब शांत वृत्‍तीच्या कोकणावर लादले आहेत. कोकणात मुख्य व्यवसाय शेती आहे. परंतू तेथे सरकारने सापत्नभाव  वागणूक दिल्यामूळे कोकण या निसर्गरम्य प्रदेशाला दुर्लक्षीत ठेवण्यात आले आहे.
        आज कोकणातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने बंद पडले आहेत. तेथील जागा बँकांच्या आणि सरकारच्या ताब्यात आहेत. राज्याचा विचार केल्यास  कोकण विभाग शिक्षण मंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. या अभ्यासु वृत्‍तीच्या युवकांना सेवाभावी संस्था आणि शासनाने योग्य प्रकारचे मार्गदर्शन करुन कोकणातील औद्योगिक वसाहतीमधील बंद पडलेले कारखाने *(आज तेथील कारखाने  व मशिन सामुग्री ही केव्हाच तेथील प्रशासनाच्या संगनमताने चोरीला गेलेली आहे. मालक सबसिडी घेऊन मुग गिळून बसले आहेत.  हे सर्व  नुकसान आपल्या सर्व सामान्य जनतेच्या खीशातून जात आहे.  हे सर्व नुकसान आपल्यावर  वेगवेगळ्या कर रुपातूनच वसूल  होत असते.)* यासाठी  शासनाने नवीन कंपनी कायदा करुन  बंद अवस्थेतील कारखान्याची जागा  जर आपल्याच कोकणी बांधवांना नवीन उद्योग चालू करण्यास दिले,  तर नक्‍कीच कोकणाचा विकास करणे शक्य होऊन गलेलठ्ठ पगारासाठी जाणारी कोकणी युवा पिढी ही आपल्याच खेड्यात राहून व्यवसाय वा नोकरी करुन कोकणवासीयांचा मागासलेपणा दूर करतील!


*लोकनिर्माण,*
*संपादक - बाळकृष्ण कासार*
*email - balkrishnakasar5@gmail.com*