अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आज सोमवारपासून लोकल ट्रेन सुरु

 


मुंबई /लोकनिर्माण 


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आज सोमवारपासून लोकल ट्रेन सुरु हाेत आहेत. रेल्वेकडून रविवारी रात्री उशीरा यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १५ तारखेपासून लोकल ट्रेन सोडण्यात येतअसल्याचे म्हटले आहे.


    गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सुरु कराव्यात, यासाठी आग्रही होते. त्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वेकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर रेल्वेने राज्य शासनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ट्रेन सोडण्यास मंजुरी दिली आहे.