संजीवन मानव  कल्याण संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन


कल्याण/ लोकनिर्माण (राजश्री फुलपगार)


                         
      संजीवन मानव कल्याण संस्था ही सेवाभावी सामाजिक संस्था असून कळवा सहकार बाजार येथे कार्यरत असून गोरगरिबांसाठी आरोग्य विषयक अनेक शिबिरे घेऊन आपला सामाजीक क्षेत्रात ठसा उमटवीला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर या संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे आणि आरोग्यविषयक मास्क, सॅनिटायजरचे वाटप केलेले आहे.
      कळवा आणि आजुबाजूच्या परिसरात लाॅकडाऊनच्या काळात अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे आबाल व्रुद्ध आणि बालके  आरोग्य सेवेपासून वंचित राहिले आहेत. अशांसाठी संजीवन मानव कल्याण संस्था आणि ईशा नेत्रालय यांच्या माध्यमातून मोफत नेत्र शिबीराचे रविवार दिनांक ८/११/२०२० रोजी सकाळी १० ते २ यावेळेत सहकार बाजार, दुसरा मजला, कळवा पश्चिम, जि. ठाणे येथे आयोजन केले आहे. या शिबीरात महात्मा फुले योजनेअंतर्गत  तिरळेपणा आणि लहान मुलांचे आजारपणावर मोफत उपचार केले जाणार असून सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. तरी या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त सोशल डिस्टींगचे पालन करुन घ्यावा असे आवाहन आयोजित संस्थेच्या आणि संजीवन डायग्नोस्टीक क्लिनिकच्या संचालिका डाॅ. संध्या गोविलकर शिंदे यांनी केले आहे.