कोकणात टेक्सटाईल इंडस्ट्रीज आणण्यासाठी प्रयत्न, *आमदार शेखर निकम  पुढाकार घेणार

           


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर
      कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या लोकांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात यासाठी कोकणात प्रदूषणविरहीत उद्योग-धंदे आणण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कोनगावमधील अस्मिता टेक्सटाईल पार्कला भेट देऊन उद्योगाविषयी माहिती घेतली.
   जिल्ह्यात आता प्रदूषणविरहित उद्योगधंदे यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही वर्षापूर्वी लोटे येथे रासायनिक औद्योगिक वसाहत निर्माण झाली. मात्र त्या उद्योगांना आता तीस वर्षे होवून गेली आहेत. भविष्यात प्रदूषणविरहित उद्योग यावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या अनुषंगाने कोनगाव येथील अस्मिता टेक्सटाईल पार्कला आ. निकम यांनी भेट दिली. जिल्ह्यातील महिलांना मोठा रोजगार मिळू शकतो. या संदर्भात टेक्सटाईल कंपन्यांचे मालक, व्यवस्थापन आणि कर्मचार्‍यांबरोबर चर्चा केली. तसेच आपल्या सहकार्‍यांसह टेक्सटाईल इंडस्ट्रीजची पाहणी केली.