राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी
राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर मंगळवारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी सुनिल जठार यांची तर उपाध्यक्षपदी पतिक्षा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी आर.ए.खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला संस्थेचे संचालक सुघोष काळे, उल्हास पाळेकर, प्रकाश नाचणेकर, जयेंद्र कोठरकर, विवेक उर्प पिंट्या गुरव, मंगेश नागम, सुलभा शिर्सेकर आदींसह संस्थेचे सचिव श्री.माने उपस्थित होते.
