कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेच्या चेयरमन पदी डॉ. विनायक राऊत यांची बिनविरोध निवड

 

पाटण लोकनिर्माण  प्रतिनिधी  

कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक  प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वानुमते कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेच्या चेयरमन पदी प्रा. डॉ. विनायक राऊत  यांची निवड करण्यात आली. तर व्हा. चेयरमन पदी प्रा.सौ. नीता कदम यांची निवड करण्यात आली. या दोन्ही निवडी एकमताने व बिनविरोध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद गुरव यांनी काम पाहिले.



प्रा.डॉ. विनायक राऊत हे बाळासाहेब देसाई कॉलेज,पाटण मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून गेली १२ वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत आहेत.त्याच बरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे जवळपास ४० पेक्षा जास्त शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. पाटण तालुक्यातील कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्था ही नावाजलेली पतसंस्था असून मी प्रामाणिकपणे या पतसंस्थाचे काम करेन असे मत नवनिर्वाचित चेयरमन डॉ. विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. सदर निवडी वेळी कोयना महाविद्यालयीन सेवकांच्या पतसंस्थेचे संचालक डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. प्रशांत फडणीस, डॉ. डी. आर. फडतरे, प्रा. बळीराम लोहार,प्रवीण जाधव,सुहास सपकाळ, शंकर कोळी, अविनाश जाधव  यांच्या सह  माजी चेयरमन, व्हा. चेयरमन उपस्थित होते.

 सदर निवडी बद्दल राष्ट्रवादीचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जनरल सेक्रेटरी श्रीमंत अमरसिंह पाटणकर, बाळासाहेब देसाई कॉलेज चे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार  मराठी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग ऐवळे  यांनी अभिनंदन केले.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image