ह.‌भ.प.नामदेवराव भोसले सल्लागार (संचालक) पदी निवड


कोरेगाव/ लोकनिर्माण( राजेंद्र जगताप )

  शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील प्रतिष्ठित नागरिक वारकरी संप्रदाय तील मोठं व्यक्तीमत्व ह.भ.प.नामदेवराव भोसले यांची शरद मल्टिस्टेट को.आॅप क्रेडिट सोसायटी लि.वाठार स्टेशन संचलित कोरेगाव शाखेच्या सल्लागार (संचालक)पदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी अनेक पदे घेवून सातारा जिल्ह्यात निस्वार्थी भावनेने काम केले आहे. बारा ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहळा साजरा करण्यात मोठा वाटा आहे. तसेच नैम्यषारण्य, जगन्नाथ पुरी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्यात आला.    यावेळी निर्मला बर्गे शाखाप्रमुख कोरेगाव यांच्या हस्ते नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आकाश पवार, अनिकेत खार्गे क्लार्क तसेच यलाप्पा बिराजदार वेलंग शिरंबे उपस्थित होते.नियुक्तीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.