ठाणे लोकनिर्माण (सौ. राजश्री फुलपगार )
लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली आठ वर्षे जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख मध्ये साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना हिरकणी आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी संयुक्तपणे कामगार आणि महिला दिन रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील पार्वती पॅलेस हाॅटेल सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संध्या गोविलकर शिंदे संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार श्री. सुहास थोरात, गटविकास अधिकारी श्री. भरत चौगुले, देवरूख यांच्या उपस्थितीत लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले.
डॉ. संध्या गोविलकर शिंदे या संजीवनी फाऊंडेशन या संस्थेच्या संचालिका असून कोवीड काळात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. लोक निर्माण वृत्तपत्राच्या दीपावली (कोवीड) या विशेषांकात विशेष लेख प्रसिद्ध झाले होते. आणि त्या अंकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी महिलांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम हिरकणी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
डॉ. संध्या गोविलकर शिंदे यांची वैद्यकीय क्षेत्रासाठी हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता.
या वेळी लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार, देवरुखचे तहसीलदार श्री. सुहास थोरात, गटविकास अधिकारी श्री. भरत चौघुले, ऑल जर्नालिस्ट अँड फ़्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यासिन पटेल, सह संपादक श्री. युयुत्सु आर्ते, सत्यवान विचारे, विशाल रापटे, मेहरून्निसा साखरकर, हर्षद गुरव आणि राज्यातून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.