अंबाबाई मंदिर परिसरात महिलांची पूजा सुरू असताना अचानक वडाच्या झाडाला लागली आग


कोल्हापूर/ लोकनिर्माण( संजय नायर)

कोल्‍हापूरातील अंबाबाई मंदीर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून मनोभावे पूजा करण्यात आली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात.पण यावेळी अचानक वडाच्या झाडाला आग लागली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.



याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, अंबाबाई मंदिर परिसरात अनेक वर्षापासून वडाचे मोठे झाड आहे. वटपौर्णिमेनिमित्त महिला येथे पूजा करण्यासाठी येतात. महिलांची पूजा सुरू असताना अचानक वडाच्या झाडाला आग लागली. ही आग झाडाला बांधण्यात आलेल्या दोऱ्याला कापूर आणि अगरबत्तीमुळे लागली, अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.

आग लागल्‍याची माहिती मिळताच मंदिर परिसरातील यंत्रणेनी आग विझविण्यासाठीचे प्रयत्‍न केले. तसेच अग्निरोधक मशीनच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. तसेच महिलांनी पूजा करताना काळजी घेण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.