कल्याण पूर्व विकास समितीने सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेतआत्ता परियांत ३६९५ सह्या दिल्या जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद !

 


लोकनिर्माण /कल्याण प्रतिनिधी  सौ.राजश्री फुलपगार


 कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८० फुट रुंदीकरणाचे कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावे या मागणीच्या  कल्याण पूर्व विकास समितीच्या पुढाकाराने सह्यांच्या मोहीमेला सोमवारी प्रारंभ करण्यात आला आहे .या मोहीमेला जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद लाभत आहे . जवळ जवळ आत्ता १०/५/२०२३ परियात ३६९५ सह्या देऊन जनतेने उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे.



या विकास काम करीत असताना ज्यांचे घराचे प्रश्न रस्ता रुंदीकरणांमध्ये येणार आहे त्यांचे प्रश्न सोडवून पुढे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू करण्यात यावे अशी मागणी शासनाला  कल्याण पूर्व विकास समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली ते सिद्धार्थ नगर ते तिसगांव नाका या प्रस्तावित ८० फुट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालीकेने  नागरीकांच्या हरकती आणि सुचना जाणून घेण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती . या नोटीसी नुसार नागरीकांनी आपल्या हरकती अथवा सुचना  १८ मे २ ० २३ पर्यंत महापालीकेच्या नगर रचना विभागात लेखी स्वरूपात सादर करावयाच्या आहेत . परंतु या प्रक्रिये नंतर लगेचच या कामाला सुरुवात करण्यात यावी तत्पूर्वी लोकांच्या घराचे प्रश्न सोडवून काम पुढे मार्गी लागायला हवे.

 गेली १० ते १२ वर्षे या रस्त्याचे काम रखडले आहे म्हणून  प्रमुख मागणी साठी कल्याण पूर्व विकास समितीची स्थापना करण्यात आली.

मोहीमेअंतर्गत जमा होणाऱ्या सह्या मा . कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त  यांना देण्यात येणार असून, या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

काटेमानिवली नाका ते गणेश मंदीर ते माता रमाई चौक - म्हसोबा चौक ते तिसगांव नाका या यु टाईप रस्त्याचे रुंदीकरण व्हायला हवे   महापालिकेने हरकती आणि सुचना मागवील्या असल्या तरीही सर्व अडथळे दुर करून आणि बाधीतांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लगेचच मार्गी लावावा व हा रस्ता लवकरात लवकर निर्माण करण्यात येवून नागरीकांची होणारी गैरसोय आणि वाहतूक कोंडी कायम स्वरूपी दुर करण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात येत आहे .