कुरआन म्हणताे आपण सर्व एक माता-पिता पासून जन्मलाे म्हणजे आपण सर्व बांधव - डाॅ.रफीक पारनेरकर जमाअते इस्लामी तर्फे चिपळूणात ईद मीलन कार्यक्रम संपन्न

 

    चिपळूण /लोकनिर्माण (तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर )                                                                                                                                              कुरआनमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण सर्व एक माता-पितांची संतान आहाेत.अर्थातच आपण सर्वजण एकमेकांचे बांधव आहाेत.त्यामुळे आपापसात वादविवाद व भांडणतंटा न करता शांतता(अमन) प्रस्थापित करून सर्वांनी आपसात गुण्यागाेविंदाने नांदायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ट विचारवंत इस्लाम व अन्य धर्मांचे गाढे अभ्यासक डाॅ.सय्यद रफीक पारनेरकर यांनी चिपळूण येथील स्वामी विवेकानंद सभागृहात जमाअते इस्लामी हिंदच्या चिपळूण शीखा आयाेजित 'ईद मिलन' च्या कार्यक्रमात केले.                                                     डाॅ. पारनेरकर पुढे म्हणाले की केवळ उपाशी राहण्याचे नाव नाही, तर डाेळे,कान,जीभ, हात,पाय या सर्वांचा राेजा अल्लाहला अपेक्षित आहे. डाेळ्यांनी वाईट काही पाहू नये, कानांनी वाईट काही ऐकू नये.हातापायांनी टुकीचे काम करू नये.हे सर्व राेजा ठेवणाराकडून अपेक्षित आहे.राेजा माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवताे. कसे वागावे? कसे राहावे? माणुसकीने कसे जगावे? कुणाचे वाईट चिंतू नये, कुणाला त्रास देवू नये या सर्व गाेष्टींची शिकवण देताे. या जीवनानंतर निरंतर जीवन(आखिरत) आहे.त्याची आपल्या सत्कर्मांनी तयारी करावी असे आवाहन केले. कुरआनचा आदेश व संत तुकारामांच्या ओव्या सांगून ईश्वर एक आहे, याचा दृष्टांत मांडला.        

   


                                                                                     व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रणजीत राजेशिर्के,माजी नगरसेवक भरत गांगण, काेकण सीरत कमिटीचे अध्यक्ष सज्जाद काद्री,जमाअते इस्लामीचे चिपळूण शाखेचे अध्यक्ष अब्दल्लाह   सहीबाेले ,सैफ आसरे,आदी मान्यवर उपस्थित हाेते.तर चिपळूण मुस्लिम समाज या संस्थेचे कार्याध्यक्ष नाजिम अफवारे,खजिनदार अ.रऊफ वांगडे, माजी नगरसेवक फैसल कास्कर, सामाजिक कार्यकर्ते अशाेक भुस्कुटे, नामवंत निवेदक इब्राहीम सरगुराेह, माजी नगरसेविका सफा गाेठे,माजी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चिपळूणकर,स्तंभ लेखक इब्राहिम वांगडे, साहित्यिक व पत्रकार शाहिद खेरटकर,करामत मुल्लाजी,अश्रफ इसफ, रिजवान पटेल,समीर खाेत,आदी मान्यवर माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image