जीवन जगत असताना चांगले कार्य करीत राहिले पाहिजे - सौ. कमल कांबळे

 

पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)  

मानवाच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी चांगल्या प्रकारचेच कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन  सौ.कमल कांबळे यांनी केले.

        पाटण येथे कालकथित डॉ.आनंदा वीर (भाऊ) यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदरांजलीपर सौ.कमल कांबळे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अनिल वीर होते.सौ.कांबळे म्हणाल्या, "धम्माप्रमाने आचरण केले पाहिजे.या भूतलावर आपण आहोत तोपर्यंत समाजास वेळ दिला पाहिजे." राजाभाऊ जगधनी म्हणाले,"समाजापासून कोणीही दूर राहू नये.शिवाय, समाजातील घटकांनी आपल्या बांधवासह बहुजनांना एकत्रीत करून समाजाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे." भिकाजी भाऊ तथा बी.डी.वीर म्हणाले, "कालकथित डॉ.आनंदा वीर यांनी इंदू मिलमध्ये काम करीत आपला व्यवसाय सांभाळला.पुढे मुंबई सोडल्यानंतर गावी राहून रुग्णांची सेवा केली." विधिकार विजयकुमार गायकवाड म्हणाले,"डॉ.वीर हे अजातशत्रू होते.त्यांचे समाजातील सर्व घटकांशी सलोख्याचे संबंध होते." अशोक देवकांत म्हणाले,"प्रथमतः माता-पिता संस्कार देत असतात. वडील झाड तर आई सावली असते. विशेषतः बाप करारी वाटत असला तरी तो आपल्या पाल्यांच्या हिताचेच पहात असतो." 

      अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल वीर म्हणाले,"मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.तेव्हा त्याने समाजात राहूनच स्वतः बरोबरच कुटुंबाची प्रगती करावी. सामाजिक अथवा राजकीय काम करण्यासाठी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे.त्यासाठी नोकरी/व्यवसाय करून पुढारपण करावे. बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवल्याने मागतकऱ्याची भूमिका कोण्हीही घेऊ नये. जन्म-मृत्यू एखदाच असल्याने सत्कारणी जीवन लावूया." याशिवाय,अनिल वीर यांनी डॉ. भाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. 

                   सर्व वीर कुटुंबीयांनी डॉ.आंबेडकर, बुद्ध व कालकथित डॉ.वीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती-मेणबत्ती प्रज्वलित केली.मान्यवरांसह उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.संपूर्ण विधी विजयकुमार गायकवाड यांनी पार पाडला. अध्यक्षपदाचा ठरावही गायकवाड यांनी मांडला.बी.डी. वीर यांनी सर्वांच्यावतीने अनुमोदन दिले.

     सदरच्या कार्यक्रमास अशोक गजरे,सचिन कुंभार, बौद्धाचार्य सुरेश गुजर, धम्ममित्र शशिकांत देवकांत,अरुण निकाळजे,बबन (तात्या) सुपणेकर,धर्मरक्षित वीर,सुनीत वीर,नितीन वीर, एस.गुजर,सौ.रंजना चाळके, मिलिंद कांबळे,जगनाथ (बापू) वीर,छाया  वीर, लता वीर, अशोक वीर,चेतन वीर, विनोद वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, शहरातील नागरिक, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.



फोटो - डॉ.वीर व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.