कल्याण /लोकनिर्माण प्रतिनिधी सौ. राजश्री फुलपगार
कल्याण पूर्व यु टाईप रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत आहे, परंतु शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे म्हणून आता स्वतः नागरिक याचा पाठपुरावा शासनाकडून करून घेणार आहे, त्या अनुषंगाने सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. दिनांक ८/५/२०२३, कोळसेवाडी रिक्षा स्टँड सायंकाळी ५ ते ८:३० तसेच १०/५/२०२ सिद्धार्थ नगर येथे सायंकाळी ५ ते ८:३० व १२/५/२०२३ विठ्ठलवाडी पूर्व रिक्षा स्टॅन्ड. सायंकाळी ५ ते ८:३० वाजता सहकार्या ंच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सह्यांची मोहीम रबिवली जाणार आहे . व तेव्हा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन यु टाईप रस्त्याबद्दल तसेच कल्याण पूर्व चा विकास व्हावा या अनुषंगाने कल्याण विकास समितीतर्फे नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे.
या वेळी संजय निरभवणे, रुपेश एखंडे , प्रवीण नांदोस्कर विजय भोसले, राम मोहिते, मीनाक्षी आहेर, सुरेखा गावंडे, अनिता पाटील, राधिका शिवणकर, पूजा सरदार, उपस्थित होते