एचएससी परीक्षेत बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश

 

पाटण /लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड )

येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एचएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले.



   महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा 96.53 टक्के, विज्ञान शाखेचा 95.87 टक्के, कला शाखेचा 67.8, बॅंकींग फायनान्सीयल शाखेचा 96.29, हॉर्टीकल्चरल शाखेचा 93.54 टक्के व इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीचा 95.45 टक्के निकाल लागला.  

    वाणिज्य शाखेतून अस्मिता थोरात हिने 85.50 टक्के गुण मिळवून प्रथम, धनश्री जाधव 85.17 टक्के मिळवून द्वितीय व तुकाराम शिंदे 83.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

    विज्ञान शाखेतून साक्षी पाटील 85 टक्के गुण मिळवून प्रथम, सानिका जाधव 82.33 टक्के मिळवून द्वितीय व महेश सूर्यवंशी 81 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

    कला शाखेतून दर्शना जाधव 79.50 टक्के गुण मिळवून प्रथम, सिमा मोळावडे 77.83 टक्के मिळवून द्वितीय व राज निकम 73.50 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

    बॅंकींग फायनान्सीयल सर्विसेस अँड इन्शुरन्समधून अक्षता जाधव 80.83 टक्के मिळवून प्रथम, सायली घाडगे 77.5 टक्के मिळवून द्वितीय व साक्षी सुतार 76.5 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

      हॉर्टीकल्चरमधून देवयानी मोहिते 90.33 टक्के गुण मिळवून प्रथम, सुजल सावंत 78.83 टक्के मिळवून द्वितीय व ओंकार मोहिते 72.67 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

     इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीतून सुधीर पवार 67 टक्के गुण मिळवून प्रथम, सुमित टोपले 65.67 टक्के मिळवून द्वितीय व आर्यन कदम 64.83 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

वाणिज्य शाखेतून एकूण 202 विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी 195 उर्त्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून एकूण 291 विद्यार्थ्यांपैकी 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून 161 पैकी 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

     यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक  याज्ञसेन पाटणकर, संचालक संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. डी. पवार आदींसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.