चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे नमन व जाखडी या लोककलांना राजश्रय मिळण्याची शक्यता!

 चिपळूण लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर )



चिपळूणचे आमदार शेखर निकम  यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज़ उठविला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाकडी या लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे.

    सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

      कोकणातील दशावतार वगळता नमन, जाकडी अशा महत्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाकडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करीत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाकडी मंडळांना  कोणत्याही  कलाकारांना  सुविधा अथवा मानधन मिळत नाही.  या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात नमन, जाकडी या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी करण्याची ग्वाही दिली होती.