लोकनिर्माण /कल्याण प्रतिनिधी सौ.राजश्री फुलपगार
कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८० फुट रुंदीकरणाचे कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावे या मागणीच्या कल्याण पूर्व विकास समितीच्या पुढाकाराने सह्यांच्या मोहीमेला सोमवारी प्रारंभ करण्यात आला आहे .या मोहीमेला जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद लाभत आहे .
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली ते सिद्धार्थ नगर ते तिसगांव नाका या प्रस्तावित ८० फुट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालीकेने नागरीकांच्या हरकती आणि सुचना जाणून घेण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती . या नोटीसी नुसार नागरीकांनी आपल्या हरकती अथवा सुचना १८ मे २ ० २३ पर्यंत महापालीकेच्या नगर रचना विभागात लेखी स्वरूपात सादर करावयाच्या आहेत . परंतु या प्रक्रिये नंतर लगेचच या कामाला सुरुवात करण्यात यावी कारण विविध राजकीय पक्षांची मंडळी या ना त्या कारणाने अडथळे उभे करत असल्याने गेली १० ते १२ वर्षे या रस्त्याचे काम रखडले आहे म्हणून प्रमुख मागणी साठी कल्याण पूर्व विकास समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या विद्यमाने सोमवार पासुन कोळसेवाडीतील रिक्षा स्टॅन्ड बोगद्याजवळ सह्याची मोहीम चालु करण्यात आली होती. ही मोहीम १२ मे पर्यंत विविध ठिकाणी चालू रहाणार असून दिनांक १०/५/२०२३ रोजी सिद्धार्थ नगर येथे सायंकाळी ५ ते ८:३० व १२/५/२०२३ विठ्ठलवाडी पूर्व रिक्षा स्टॅन्ड संध्याकाळी ५:०० ते ८:३० मोहीमेअंतर्गत जमा होणाऱ्या सह्या मा . कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात येणार असून, या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे .
काटेमानिवली नाका ते गणेश मंदीर ते माता रमाई चौक - म्हसोबा चौक ते तिसगांव नाका या यु टाईप रस्त्याचे रुंदीकरण व्हायला हवे महापालिकेने हरकती आणि सुचना मागवील्या असल्या तरीही सर्व अडथळे दुर करून आणि बाधीतांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लगेचच मार्गी लावावा व हा रस्ता लवकरात लवकर निर्माण करण्यात येवून नागरीकांची होणारी गैरसोय आणि वाहतूक कोंडी कायम स्वरूपी दुर करण्यात यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
सह्यांचे मोहीम चालू असताना खालील सदस्य उपस्थित होते. संजय निरभवणे, प्रशांत मोरे, विजय भोसले, प्रमोद दिवेकर, मनोज नायर, राम मोहिते, अंकुश राजपूत, भाऊसाहेब वावीकर, प्रवीण नांदोस्कर, श्रीनंद पाचधरे, रुपेश एखंडे,सुधीर रामराजे, गणेश पाबळे, संजय भालेराव, संदीप शेळके, भूपेंद्र पाटील, रमेश केदारे, संकेत शेळके, अशोक भोसले, प्रशांत कासारे,सुराळकर, प्रकाश पाटील, नितीन पवार सौं. राधिका गुप्ते,सौं. मीनाक्षी आहेर, सौं. राधिका शिवणकर, सौं सुरेखा गावंडे, श्रीमती पूजा सरदार, श्रीमती प्रेमा न्यायनीत, श्रीमती उर्मिला पवार, कुमारी उमा बनसोडे, सौं. अनिता पाटील इ. सभासद, नागरिक उपस्थित होते.