बाळासाहेब देसाई महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश

 

पाटण लोकनिर्माण (श्रीगणेश गायकवाड)



२०२२ - २३ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे विविधस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करत असते. सामान्यातील सामान्य विद्यार्थ्याला इंजिनिअर, मेडीकलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एमएचटी-सीईटी ही पात्रता परीक्षा मेटीरमध्ये उत्तीर्ण व्हावी लागते. बाळासाहेब देर्साइ महाविद्यालयातील पीसीएम ग्रुपमध्ये शुभम किशोर अडसुळे 93.38 टक्के, महेश प्रदीप सूर्यवंशी 91.01 व ओमकार संजय कुंभार याने 90.12 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर पीसीबी ग्रुपमध्ये कु. सानिका सतीश जाधव हीने 99.06 टक्के, कु. समिक्षा बाळासो पवार 87.99 व प्रणव प्रकाश पवार याने 87.39 टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच पीसीएम ग्रुपमध्ये निखील पवार 85.88 टक्के, हरीष पवार 81.01 टक्के, प्रणव कुंभार 77.79 टक्के, हर्षद महाबळ 73.42 टक्के, पायल सत्रे 71.05 टक्के, प्रतिक्षा पिटे 69.69 टक्के, राजनंदिनी ढाणे 69.69 टक्के, प्रज्ञा शिंदे 67.15 टक्के, शुभांगी सुतार 59.40 टक्के, सिध्देश मोहिते 56.89 टक्के, सुषमा बोर्गे 46.45 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

पीसीबी ग्रुपमध्ये धनश्री पवार 87.17 टक्के, सानिका पवार 84.94, श्रध्दा पाटील 82.05, ईश्वरी खटावकर 79.30, चंद्रभागा संकपाळ 78.01, साक्षी पवार 77, हर्षदा पवार 77, विक्रांत सूर्यवंशी 75.25, पियुषा भिंगारदिवे 73.48, ऋुतुजा कळके 70.48, साक्षी माळी 66.88, सायली सूर्यवंशी 66.45, मयुरी सुर्वे 64.60, अंकीता पवार 64.55, सुहानी घाडगे 64.51, दिक्षा मळेकर 62.23, सलोनी रेवडे 62.23, दीपक सुतार 59.40, सृष्टी गवळी 54.62, प्रिती पवार 52.43, सुमित्रा भोसले 50.90, सुरज देसाई याने 45.43 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक याज्ञसेनपाटणकर, संचालक संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एच. डी. पवार, पर्यवेक्षक प्रा. दिपक दाभाडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image