चिपळूण लोकनिर्माण टीम
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणाऱ्या येथील चिपळूण तहसील कार्यालयाचा एक प्रताप पुढे आला आहे. नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या यादीत चक्क एका मृत कर्मचाऱ्याचीही नियुक्ती केली गेली आहे. तर काही महिन्यांपूर्वी जिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तहसील कार्यालयाने संबंधित खात्याकडून कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती न घेता गतवर्षीच्याच यादीनुसार कर्मचारी नियुक्त केले गेल्याने हा गोंधळ उडाल्याचे समोर येत आहे.