बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक पहाणी करणार

 

राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार)

बारसूच्या सड्य़ावर असलेल्या कातळशिल्पांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. युनेस्कोनेही बारसूतील कातळशिल्पाला वारसास्थळ जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहेअशावेळी कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प लादू नये, अशी मागणी जोर धरत आहे. १३ जून रोजी सकाळी १० वाजता बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक पहाणी करणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत सहभागी होणार आहेत.

बारसूच्या सडय़ावर असलेली कातळशिल्प हा आता राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा विषय झाला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू ते देवाचे गोठणे येथील सडय़ावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभांनी तसे ठरावही केले आहेत. यातील काही कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी ग्रामस्थ करत आहेत.बारसू परिसरातील कातळशिल्पांची पाहणी खासदार विनायक राऊत देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक यांच्या समवेत १३ जून रोजी सकाळी १० वाजता स्थानिक ग्रामस्थांना घेऊन करणार आहेत. या संशोधकांमध्ये डॉ. पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, डॉ. प्रबिन सुकुमारन आणि अभ्यासकांमध्ये सुधीर रिसबुड, सतीश ललित आदींचा समावेश असेल.


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image