एस. टी. को. ऑप. कर्मचारी बँकेच्या संचालक पदाकरता श्री.विजय कोळी यांना उमेदवारी

 

पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी 

राज्यातील एक अग्रेसर आणि सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली असणारी महाराष्ट्र एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२३ - २०२८ वर्षाकरताच्या संचालक पदाचे निवडणुकीचे  बिगुल वाजले असून या निवडणुकीसाठी एकूण १९ संचालक पदाला उमेदवार निवडले जाणार आहेत.  मुंबई रायगड या दोन जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून पनवेल आगारात काम करणारे  श्री विजयकुमार संभाजी कोळी  महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या पॅनल कडून उमेदवार म्हणून लढत आहे. अतिशय सर्व सामान्य कुटुंबामधून तयार होत असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून श्री.विजय कोळी यांच्याकडे पाहिले जाते. 

   मुंबई विभागीय सचिव म्हणून आज पर्यंत संघटनेमध्ये काम करत आहेत. नेहमीच एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रशासनाशी भांडण करुन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करत आहेत. अतिशय नम्र स्वभाव, संयमी आणि विचारवंत अशा प्रकारचा उमेदवार महामंडळ बँकेच्या संचालक पदावर पाठवला तर नक्कीच भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक हक्काचा माणूस म्हणून कुठल्याही प्रकारच्या संदर्भात ते नक्कीच काम करतील यात शंका नाही अशी भावना सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सामजिक क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात श्री. विजय कोळी आजपर्यंत विविधक्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहतात. त्यांना मिळेल उमेदवारीमुळे मुंबई , रायगड विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जवळपास ८४ हजार मतदार मधून १९ संचालक एस. टी. कामगार बँकेच्या संचालक पदावर निवडण्यात येणार असून  सर्व ग्रामीण व शहरी भागातील असे कर्मचारी, अधिकारी यांनी आपले बहुमूल्य असे मत श्री विजय कोळी आणि महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या पॅनलला देऊन सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी विजय कोळी मित्रपरिवार मुंबई आणि रायगड जिल्हा यांच्या वतीने करण्यात येत आहे.