विरारहून गुहागरला जाणारी एसटी बस महामार्गावरच उलटली

 

खेड लोकनिर्माण प्रतिनिधी 

मुंबई गोवा महामार्गावर मोरवंडे मोदगेवाडीनजीक बुधवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास विरारहून गुहागरला जाणाऱ्या एस.टी. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गावरच उलटली.या अपघातात चालकासह आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

     मुंबई गोवा महामार्गावरून जाणारी विरार-गुहागर बस लोटे येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मनसेचे तालुकाप्रमुख दिनेश चाळके तसेच नरेंद्र गावडे यांनी प्रवाशांना खासगी वाहनांमधून बसवून लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये पाठवले तसेच काही प्रवाशांना महामार्गावरील इतर वाहने थांबून त्यात बसून उपचारासाठी पाठवले. या अपघातात प्रकाश भास्कर पावसकर (६४, रा. चिपळूण), अंकूश उत्तम जाधव (३५, रा. गुहागर), महादेव गोरक्ष शेंडे (४०, रा. गुहागर), मानसी संजय कदम (१५, रा. वाघिवरे), निकिता संतोष डिंगणकर (१६, रा. वेहेळे- चिपळूण), विलासिनी विलास हेगिष्टे (६०, रा. विरार) व अंकिता संतोष डिंगणकर (२०, रा. चिपळूण) हे सात प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर लोटे येथील परशुराम रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली.