चिपळूण लोकनिर्माण टीम
पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन हि सर्वात मोठी गरज आहे हे आपणास माहीतच आहे व आपल्या वनखात्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा कर्तव्याचा भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्या वनखात्यामार्फत वृक्ष संवर्धनाचा फज्जा उडवल्याचे वृत्तपत्रांमधून पाहावयास मिळत आहे. बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तोडीमुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे हे जनता अनुभवत आहे. मागील वर्षभरात बेसुमार झालेली जंगलतोड मुले वन्य जीवावर त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यात नव्हे तर काई ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्यात निष्पाप नागरिकांना प्राण देखील गमवावे लागलेत तर काहीं गंभीर जखमी हि झालेत याचा अर्थ असा कि वृक्ष तोडीमुळे प्राणी जंगल सोडून गाव व शहराकडे निघालेत हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोन दिवसापूर्वी खेर्डी येथे येथे बिबट्याने वृद्धावर हल्ला केला आणि सदर बिबट्या त्याच ठिकाणी मयत झाला. पशुवैद्यकीय यांनी शवविच्छेदन केले असता असे निदर्शनास आले कि उपासमारीमुळे बिबट्याचा प्राण गेल्याचे सांगितले.
वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असून जंगल तोडीसाठी देत असलेल्या परवानगीमुळे जिल्ह्यातील जैविविधतेला धक्का पोहचविण्याचे काम करत आहात असे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. येणाऱ्या काळात वरील सर्व घडामोडीतुन लाभ घेऊन वनसंवर्धन नक्कीच कराल असे वाटते याबाबत वनविभागाचे कार्यतत्पर अधिकारी निलख यांज कडे निवेदन देण्यात आले यावेळी माजी सभापती तथा पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम, शहरयुवक अध्यक्ष सिद्धेश लाड, सचिन साडविलकर, आल्हाद यादव, अभिजित खताते, मनोज जाधव, नैनीश गूढेकर, अमित विन्चु आदी उपस्थित होते.
वन अधिकारी सचिन निलख यांना निवेदन देताना
राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते शौकत मुकादम, सचिन साडविलकर,सिद्धेश लाड,मनोज जाधव आणि पदाधिकारी
छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)