रोमन boy आलाय आपल्या भेटीला......!


 मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर)



दि. ७ जून 2023 संध्याकाळी सहा वाजता मुंबई अंधेरीतील 99 STUDIO मध्ये 7merry Film Production च्या अंतर्गत "रोमन बाय " ह्या video Album चे अनावरण करण्यात आले, सागर कोळी व तेजस्विनी कोळी निर्मित ह्या अल्बमचे अनावरण प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते राकेश बेदी ह्यांच्या हस्ते करण्यात आले, ह्यावेळी हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर निर्माते व दिग्दर्शक उपस्थित होते, विजय पाटकर हे कसलेले अभिनेते अल्बमचे प्रमुख आकर्षण आहे. सागर कोळींना "रोमन बाय " बद्दल विचारले असता, रोमन बाय नांवाची अतिशय सुंदर व देखणी बाई होती, अशी दंतकथा सांगीतली जाते, जिला बघायला पुरुषच काय पण स्रीयाही खिडकीतून डोकावून दर्शन घ्यायच्या! अर्नाळा गांवातील निसर्गरम्य अश्या सुंदर समुद्र किनारी व भरलेल्या बाजारपेठेत शूट करतांना  भरपूर अडचणी आल्या असतांना सुद्धा सर्व कलाकार व टेक्नीकल टिमने मेहनत, कष्ट घेवून ,हा अतिशय सुंदर असा " रोमन  बाय " आपल्या भेटीस आणला आहे!                   

   निर्माता: सागर कोळी         

सह निर्माती : तेजस्विनी कोळी

मुख्य कलाकार : विजय पाटकर, दिव्या शिंगाडिया

दिग्दर्शकः पराग सावंत

संगित दिग्दर्शक : कबिर शाक्य

नृत्यदिग्दर्शक : नॉडी रसल

कॅमेराःदिलीप गंगोडे

प्रॉडक्शन हेडः हॅरी मल्या

कॉस्टींग डायरेक्टर :निलेश कर्णिक

ग्रॉफीक्स आणि डि . आय . साधन भोईर

ई.पी : करिश्मा अडे

प्रॉडक्शन मॅनेजर : गिरीश माळकर   निर्माता म्हणून त्यांना अजून बरेच प्रोजेक्ट करायचे आहेत, एक कोळी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, हिंदी मालीका, वेबसिरीज व अनेक मोठमोठे आकर्षण आहेत. आमच्या समूहातर्फे हार्दीक शुभेच्छा!