देवरुख लोकनिर्माण प्रतिनिधी
शासनाकडून वृद्ध कलाकारांना मानधन मिळवण्यासाठी असलेली ४८ हजारापर्यंतची उत्पन्नमर्यादा वाढवण्यात यावी त्याचबरोबर शासकीय मानधन मिळण्याचा नमन कलावंतांसाठी असलेला 'क'' वर्गाचा दर्जा 'ब'' वर्गात मानधन मिळावे असा ठराव करण्यात आला. जिल्ह्यातील नमन कलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वपूर्ण निर्णय नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले आहे.
देवरूख येथे नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवारी (ता. ५) जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या सभेमध्ये प्रथम मृत झालेल्या झालेल्या कलाकारांना संघटनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नमन कलावंतांच्या अभिनंदनाचे ठरावसुद्धा सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणे घेण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सचिव परशुराम मासये यांनी वाचून दाखवले. त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. या सभेमध्ये नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यात आली.
संगमेश्वर तालुका मंडळ कार्यकारिणी आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे सहसंपादक युत्युसू आर्ते यांनी सभेचे आयोजन केले होते.