संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद हे सध्या विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे येत आहेत. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत खत वाटपाचा कार्यक्रम केला असून वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. त्यातच आता जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना भाई घोसाळकर हायस्कुल येथील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम त्यांनी कडवई बाजारपेठ येथे केला आहे.
सद्या पावसाचे दिवस येवू घातले असताना लोकांची आणि विद्यार्थ्यांची गरज ओळखत सिद्धेश ब्रीद यांनी जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी काही दिवसातच मोफत छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन यांचा लाभ सुमारे १०००० हजार पेक्षा जास्त लोकांना होणार आहे. विविध सामाजिक कार्याचा वसा उचलत लोक अभिमुख कार्य सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून केले जात आहे. सिद्धेश ब्रीद यांच्या कार्याचा गौरव लोक समूहातून दिले जाणाऱ्या आशीर्वादाने होत आहे. यावेळेस श्री.वसंत उजगावकर, डॉ.अमित ताठरे, शंकर लिंगायत, मिलिंद चव्हाण, कृष्णा हरेकर, बापू कदम, मयुर लिंबुकर, स्वप्निल पुरोहित, कल्पेश ओकटे, पप्पू सुर्वे, नरेश गुरव, कृष्णा येलोंडे, बंड्या मयेकर, पप्प्या मयेकर, देवेंद्र शिंदे, श्रीकांत डीके, हे उपस्थित होते.