मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी
दलित पॅंथर ची स्थापना १९७२ रोजी पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांनी केली.गरिब,दिन दुबळे,दलित, मागसवर्गीय, कामगार,महिलांवरील अत्याचाराच्या विरोधी लढणारी ही संघटना आहे.गेली ५१ वर्षाच्या वाटचालीत दलित पॅंथर ने अनेक स्थितंरे पाहीली आहेत.अनेक सामाजिक चळवळीला वळण देण्याचे काम यांनी केले आहे.या संघटनेला ५१ वर्ष झाले.या वर्धापनादिनानिमित्त स्थळ-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंञालय,मुंबई ३२ येथे भव्य सोहळा संपन्न झाला.यावेळी ढोल ताशे,तुतारी,मैदानी खेळाची प्रात्यक्षिके करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दीपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.छञपती शिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दलित पॅंथरचे महाराष्टराज्य प्रदेश अध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उत्पादनशूल्कमंञी नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते विविध क्षेञात कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यांना आकर्षक सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरवविण्यात आले.यामध्ये अभिनेञी नम्रता गायकवाड(कला,नाट्य),प्रा.राजेंद्र सोनवणे(काव्य,साहित्य),सी.एच.हिरेमणी(सरकारी क्षेञ) प्रा.शिरीष देसाई(शिक्षण), अॅड.प्रफुल्ल भुजबळ (कायदे) , संजयभाऊ खंडागळे(सामाजिक); अली मर्चंट(उद्योग), प्रशांत वाघमारे(उद्योग), कृष्णकांत चन्ने(उद्योजक),आझम शेख(उद्योजक),राजेश प्रसाद(उद्योजक),आबासाहेब पाटील(सामाजिक),किरण पवार (सामाजिक)इ.मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
तसेच दलित पॅंथर च्या आठवणींना उजाळा देणा-या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आहे."पॅथर संस्थापक नामदेव ढसाळ आणि सुखदेव सोनवणे यांचा दलित पॅंथर चळवळीसाठी संघर्ष ..!"चे ना.शंभूराजे देसाई यांचे शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी ना.शंभुराजे देसाई आपल्या मनोगतात म्हणाले की,"दलित पॅंथरच्या विचारांचा खरा लढा सुखदेव तात्या सोनवणे अनेक वर्षांपासुन चालवत आहे. दलित पॅंथरला कार्यक्षम ठेवण्याचे काम करत आहे.रस्त्यावरची लढाई ते करत आहेत.पॅंथर नामदेव ढसाळाचे ते खरे वासरदार आहेत.लवकरच शासनाच्यावतीने महाराष्टातील महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांचे स्मारक त्यांच्या पुर कन्हेसर जन्मगावी उभारणार आहे. ज्यातून अनेक सामान्य माणसांना लढण्याची प्रेरणा मिळेल."
सदर कार्यक्रम रविवार दि.९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वा. स्थळ-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंञालय,मुंबई-३२ येथे भव्य सोहळा संपन्न झाला. .दलित पॅंथर या सामाजिक संस्थेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्टातून पॅंथर पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध क्षेञातील मान्यवर, काव्य,साहित्य प्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते. आहे.
दलित पॅंथर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम सोनवणे ,दलित पॅंथर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे,पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे तसेच पॅंथर सर्व पदाधिकारी यांनी संयोजनात पुढाकार घेतला.