उद्योजक वसंत उदेग यांचा कोकण आयडॉल सन्मान पुरस्काराने होणार गौरव - दादर येथे १६ रोजी होणार पुरस्कार वितरण

 


चिपळूण लोकनिर्माण प्रतिनिधी 

ग्लोबल कोकण आणि कोकण क्लबच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग कोकण आयडॉल सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दिनांक १६ जुलै दुपारी ३ ते रात्री ९ वाजता  राजा शिवाजी विद्यालय, दादर पूर्व  आयोजित केला आहे.

     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणातील  पाच जिल्हे, मुंबई शहर आणि उपनगर मधून, गावागावात असामान्य काम करणाऱ्या  ७५  व्यक्तिमत्त्वांचा कोकण आयडॉल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

    यामध्ये चिपळूण तालुक्यातील  कळवंडे गावाचे सुपुत्र आणि नामवंत उद्योजक वसंतदादा उदेग यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. वसंत उदेग हे सामाजिक शैक्षणिक आणि उद्योजक  क्षेत्रात कामगिरी करणारे दीपस्तंभ आहेत.  कृषी क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी शेतकऱ्यांना यशाच्या शिखरावर नेणारी आहे. आता पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

    याच कार्यक्रमात कोकणातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासातूनच कोकणचा शाश्वत विकास पुढील सात वर्षांत कसा होऊ शकतो यावर चर्चा सत्र, मार्गदर्शन "व्हिजन कोंकण विकास परिषद २०३० मधून होणार आहे.


     भविष्यातील कोकण विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री , उद्योग मंत्री उदयजी सामंत , छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले छत्रपती, आमदार प्रसादजी लाड, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, लोकमान्य टिळकांचे वंशज कुणालजी टिळक, राज्याचे माजी मुख्य सचिव द म सुकथनकर आणि अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.  कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे निमंत्रितांसाठी हा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण कोकणातून ८०० उद्योजक, व सन्माननीय व्यक्तिमत्व या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. वसंत उदेग यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image