खेड लोकनिर्माण प्रतिनिधी
खेड तातालुक्याच्या खोपी येथिल गोरेवाडी ठिकाणी पोलिसांना खबरी कडून गुप्त माहिती मिळताच खेड पोलीस पथकाने धाड टाकुन एकुण 58 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीत गावठी दारु बनवताना आरोपी बाबू बाळाजी गोरे याने जंगलात पलायन केले असे पोलिसांनी सांगितले. या कार्यवाहीत दारु बनविण्याची साधने गुळ व नवसागर मिश्रित रसायन,भट्टी, क्यन , बेरेल, व इतर साहित्य जप्त केले. मात्र पोलिसांनी इतर आरोपी कुठे पळाले या बद्दल सांगितले नाही.
पोलिस तपास अधिकारी हे समजले नाही .पोलिसांनी महारास्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गून्हा दाखल केला असुन पोलिस तपास करीत आहेत.विशेष म्हणजे बाबू बाळाजी गोरे हा दारु अनधिकृत भट्टी गेल्या 10 वर्षापासून चालवतो याचे आश्चर्य वाटते.