रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी
"ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल " राष्ट्रीयकृत पत्रकार संघटनेची राज्यात घोडदौड चालू असताना सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी प्रत्येक तालुक्याला नुतन अध्यक्ष देण्यासाठी चिपळूण प्रमाणे रत्नागिरीतील रंगयात्रीचे निर्भीड पत्रकार रुपेश चवंडे यांची रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी निवड केली आहे.
निवड करण्यात आल्यानंतर रंगयात्रीचे संपादक शेखर भुते, लोकनिर्माण चे संपादक तथा एजेएफसी चे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार आणि एजेएफसी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
त्यांच्या निवडीने तालुक्यातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.