खेड लोकनिर्माण प्रतिनिधी
गेेल्या 24 तासात तालुक्यात 32 मि.ली. तर एकुण 477 मि. ली. पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आणि पर्यटकांना खुणवणारा व उंचावरून कोसळणारे व फेसाळणारे धबधब्यांनी मोहीत करणारे रघुवीर घाटातील शिंधीजवळील एका डोहात ओमकार दहिवलकर रा. वेरळ तालुका खेड जि. रत्नागिरी तरुणाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्घटना घडल्याने पर्यटनाच्या सुरुवातीलाच गालबोट लागल्याने पर्यटकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
पर्यटकांनी देखील रघुवीर घाटात दरडी कोसळत असल्यामुळे कोणतीही जोखीम घेऊ नये. आपणच आपली जबाबदारी घ्यावी. तर अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन व्यापारी बंघुनी व नदी काठी राहणा-या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. रघुवीर घाटात दरड कोसळल्याने पर्यटकांचे नुकसान होवु नये. प्रशासनाच्या वतीने दरड बाजुला करण्याचे युध्दपातळीवर जेसीबीच्या माध्यमातून काम सुरु आहे. माध्यमातून काम सुरु आहे.