बारसू गोवळ येथे माती परीक्षणाविरुद्ध केलेल्या आंदोलना प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांनवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांची घेतली भेट.....


राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)

   बारसू गोवळ येथे अन्यायकारक माती परीक्षणास विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत आज विधिमंडळामध्ये आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सह नेते भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार वैभव नाईक, यांनी उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांची भेट घेऊन चर्चा केली.

   


 

   चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांची भेट घेऊन चर्चा करून बारसु-गोवळ ता.राजापूर जि. रत्नागिरी येथे दिनांक २४ एप्रिल ते ११ में, २०२३ या दरम्यान पठारावर शासनातर्फे माती परिक्षण करण्यात आले होते. सदर माती परिक्षणाविरुध्द आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे ३५९ ग्रामस्थांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर माती परिक्षणाबाबत माहितीचा अधिकार कायदयातंर्गत माहिती घेण्यात आली असता येथे केलेले माती परिक्षण हे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे सिध्द झालेले असल्यामुळे हे माती परिक्षण व माती परिक्षणाचा अहवालही बेकायदेशीर ठरला आहे.या माती परिक्षणासाठी शासकिय यंत्रणांचा गैरवापर व जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असल्याचे स्पष्ट झाले असून यांच्याविरोधात असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा केली असता उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेतो असे आश्वाशीत केले.

Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ
अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज
Image